नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक निर्णय कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांदा व भुसार शेतीमालातून जात असलेली दोन टक्के हमाली, तोलाई आता यापुढे कपात केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ची परंपरा खंडित करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व भुसार शेतीमालाचेव्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच उद्या 01 एप्रिल 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाद्वारे शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याच्या पट्टीतून दोन टक्के हमाली आणि तोलाई कपात केली जात होती. मात्र आता हि कपात न करण्याचा निर्णय कांदा व्यापारी असोसिएशन घेतल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
येवला-अंदरसूल व्यापारी असोसिएशने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यानुसार जिल्ह्यातील सर्व कांदा आडते आणि खरेदीदार एक एप्रिलपासून शेतकऱ्याच्या विकलेल्या मालाच्या पट्टीतून हमाली तोलाई कापणार नाही. यापूर्वी गुंतागुंतीची पद्धत तयार करून आत्तापर्यंत व्यापारी आणि शेतकरी दोघे यांच्यात भरडला गेलेला आहे. मात्र आता असं होणार नसल्याचे बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.