Agriculture News :उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये (Temperature) उष्णतेमुळे बाजारात गाजर, बीट आणि काकडीच्या मागणीत वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी ज्या काकडीच्या किलोचा (Kakadi Rate) भाव १० रुपये होता, तो आज ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे काकडी उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
काकडीमध्ये पाण्याचा अंश असल्याने उन्हाळी हंगामात (Unhali Season) याला चांगली मागणी असते. तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठी काकडीची मागणी वाढते. या भाज्यांमध्ये पाणी आणि पोषणतत्त्वांची मात्रा असल्यामुळे त्यांचा आहारात समावेश करण्यास पसंती मिळत आहे. काकडीत भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. फायबर्स पचन संस्थेला उत्तेजन देतात आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी एक उत्कृष्ट पर्याय आहे. काकडीत २५ टक्के पाणी असल्यामुळे ती शरीरातील पाण्याच्या कमतरतेला भरपूर आराम देते. गोष्ट शरीरातील तापमान नियंत्रणासाठी आणि डिहायड्रेशन रोखण्यास उपयुक्त आहे. काकडीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी ज्या काकडीच्या किलोचा भाव १० रुपये होता, तो आज ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
कोशिंबीरमध्ये वापर; काकडी वजन घटवते
तसेच काकडीत असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. काकडीच्या किमतीतील वाढ शेतकऱ्यांच्या उत्पादनातील तुटवडा, बाजारातील वाढती मागणी यामुळे झाली आहे. ग्राहकांमध्ये सध्या काकडीची मागणी वाढलेली आहे. दोन महिने दर असेच राहू शकतात. काकडीत कमी कॅलरीज आणि पाणी जास्त असल्यामुळे ते शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामुळेच कोशिंबीरमध्ये काकडी महत्त्वाचा भाग आहे.
असे आहेत बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
23/03/2025 | ||||||
जुन्नर - नारायणगाव | --- | क्विंटल | 200 | 300 | 2000 | 1300 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 120 | 500 | 600 | 550 |
सातारा | --- | क्विंटल | 20 | 1000 | 1500 | 1250 |
राहता | --- | क्विंटल | 28 | 500 | 1000 | 700 |
पुणे | लोकल | क्विंटल | 1284 | 800 | 1600 | 1200 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 2 | 2000 | 2200 | 2100 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 310 | 500 | 1000 | 750 |
जुन्नर -ओतूर | लोकल | क्विंटल | 232 | 1000 | 2300 | 1650 |
कराड | लोकल | क्विंटल | 39 | 1000 | 1700 | 1000 |
भुसावळ | लोकल | क्विंटल | 43 | 1000 | 1500 | 1200 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 18 | 300 | 2300 | 1600 |
बारामती-जळोची | नं. १ | क्विंटल | 15 | 600 | 1000 | 800 |