Lokmat Agro >बाजारहाट > प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे केंद्रीय संस्थांना वितरण, नेमकं कारण काय? 

प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे केंद्रीय संस्थांना वितरण, नेमकं कारण काय? 

Latest News Distribution of 2 lakh metric tonnes of wheat and rice each to central agencies | प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे केंद्रीय संस्थांना वितरण, नेमकं कारण काय? 

प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे केंद्रीय संस्थांना वितरण, नेमकं कारण काय? 

Rice Wheat : अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदूळ केंद्रीय संस्थांना वितरित करण्यात आले आहे.

Rice Wheat : अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदूळ केंद्रीय संस्थांना वितरित करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून दिनांक 02 जून 2024 पर्यंत, 2 लाख 73 हजार 820 मेट्रिक टन गहू आणि 2 लाख 27 हजार 31 मेट्रिक टन तांदूळ केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (एमएससीएमएफएल) सारख्या निमशासकीय आणि सहकारी संस्थांना वितरित करण्यात आले आहे. यासाठी या मंत्रालयाने 1 लाख 69 हजार 422 मेट्रिक टन गहू आणि 1 लाख 7 हजार 707 मेट्रिक टन तांदूळ भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचलला आहे. 

देशभरातील गहू/पीठ यांच्या वाढत्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (एमएससीएमएफएल) सारख्या निम शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत (देशांतर्गत) (ओएमएसएस (डी) 19.10.2023 च्या पत्रानुसार या वितरित केलेल्या गव्हाचे पीठात रूपांतर करून ते "भारत आटा" ब्रँड अंतर्गत सामान्य ग्राहकांना विकण्यासाठी गव्हाचे अतिरिक्त वाटप केले.

ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने, त्यांच्या दिनांक 18.01.2024 च्या पत्राद्वारे, केंद्रीय भंडार/ एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड (एमएससीएमएफएल) सारख्या निम शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत (देशांतर्गत) [(ओएमएसएस (डी)] "भारत राईस/ भारत चावल" ब्रँड अंतर्गत सामान्य ग्राहकांना विक्री करण्यासाठी नॉन-फोर्टिफाईड तांदुळाची  अतिरिक्त तरतूद केली. 

भारत ब्रँड अंतर्गत विक्री 

त्यानुसार, भारतीय अन्न महामंडळ 'भारत' ब्रँड अंतर्गत वितरणासाठी वर नमूद केलेल्या संस्थांनी  केलेल्या मागणीनुसार आणि मंत्रालयाने जारी केलेल्या वितरणानुसार योग्य वहनाद्वारे साठ्याची उपलब्धता सुनिश्चित करत आहे. सुरुवातीला या योजना 31.03.2024 पर्यंत वैध होत्या परंतु नंतर 30.06.2024 पर्यंत त्यांना  मुदतवाढ देण्यात आली. भारतीय अन्न महामंडळ संबंधित संस्थांना गहू 17.15 रुपये/किलो दराने आणि तांदूळ 18.59 रुपये/किलो दराने देत आहे. तसेच, या संस्था सर्वसामान्य ग्राहकांना 5Kg/10 kg पॅकमध्ये 27.50 रुपये प्रति किलो (आटा) आणि 29 रुपये प्रति किलो (तांदूळ) दराने अन्नधान्य विकतील.

Web Title: Latest News Distribution of 2 lakh metric tonnes of wheat and rice each to central agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.