Lokmat Agro >बाजारहाट > नाशिकचा फुलबाजार फुलतोय, हजारो महिलांना रोजगार, इथल्या बाजाराचं गणित?

नाशिकचा फुलबाजार फुलतोय, हजारो महिलांना रोजगार, इथल्या बाजाराचं गणित?

Latest News Employment of thousands of women from flower market of Nashik | नाशिकचा फुलबाजार फुलतोय, हजारो महिलांना रोजगार, इथल्या बाजाराचं गणित?

नाशिकचा फुलबाजार फुलतोय, हजारो महिलांना रोजगार, इथल्या बाजाराचं गणित?

नाशिक शहरात १५ हजाराहून अधिक नागरिक फुल व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

नाशिक शहरात १५ हजाराहून अधिक नागरिक फुल व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिकला धार्मिकनगरी, यंत्रनगरी, तंत्रनगरी म्हणून ओळखली जाते. नाशिक शहराला हजारो मंदिराचा वारसा लाभला असल्याने रोजची सकाळ चैतन्यमय असते. ही चैतन्यमय सकाळ करण्यासाठी फुल बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. अगदी पहाटेपासूनच नाशिककरांची फुले खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे मागील काही वर्षात नाशिकचा फुलबाजार चांगलाच नावारूपास येत असल्याचे दिसते आहे. म्हणूनच या फुलबाजाराची थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात पार्श्वभूमी पाहुयात. 

विविध फुलांचे हार, तोरण अशा फुलांपासूनच्या विविध वस्तूंपासून नाशिकची बाजारपेठ फुलत आहे. नाशिक जसे द्राक्ष, कांदा व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर तसा फुलांच्या व्यवसायातून कात टाकत आहे. नाशिक शहरात १५ हजाराहून अधिक नागरिक फुल व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत आहेत, सर्वात महत्वाचे यात ५० टक्के महिला व्यवसायिक आहे. शहरात जवळपास चार कोटीहून अधिक उलाढाल फुल विक्री होते. गणेशवाडीत फुल बाजार भरतो. त्यात अनेकांना रोजगार मिळालाय, पावसाच्या भरवशावर झेंडूची लागवड झाली खरी. मात्र, यंदा पावसाने साथ न दिल्याने लागवड अन उत्पादनही घटले आहे. त्यामुळे यंदा झेंडू भाव खाईल. 

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: ३५० ते ४०० एकरवर झेंडूची लागवड होते. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा लागवड २०० ते २५० एकरवर आली आहे. घाऊक व्यापारी आतापासूनच फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या संपर्कात असून, यंदा किरकोळ बाजारात झेंडूची फुले १०० ते १५० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला दोन पैसे हातात येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुका फुलशेतीत आघाडीवर आहे. निफाड, वैजापूर, येवला, दिंडोरी, वणी, कळवण या भागात फुलशेती केली जाते. 'कसमादे'त इतर भागात अत्यल्प प्रमाणात झेंडूचे पीक घेतले जाते. यंदा प्रथमच पावसाने पाठ फिरविल्याने फुलांची लागवड पुरेशी झाली नाही. झेंडूचे रोप साडेतीन ते चार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांनी विकत घेतले एका डबीत हजार सिड्स (बिया) असतात. गेल्या वर्षी एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांना मिळणारी बियाण्यांची डबी यंदा अडीच ते तीन हजार रुपयांना मिळत होती. 

गणेशोत्सव, विजयादशमीला मोठी उलाढाल 

सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्याकडून झेंडूची लागवड केली जाते. लागवडीनंतर साधारणत: ५० ते ५५ दिवसांनी फुले काढण्यास सुरवात होते. विजयादशमीचा सण डोळ्यांसमोर ठेवून ऑगस्टच्या अखेरीस व सप्टेंबरच्या सुरवातीला फुलांची लागवड करण्यात आली. मागील जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या फुलांना गणेशोत्सवात ३५ ते ४० रुपये घाऊक भाव मिळाला होता. किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने फुले विकले गेले होते. हा चढउतार आजही आहे. सध्या फुलांच बाजार तेजीतच आहे. केशरीपेक्षा पिवळ्या झेंडूची किंमत दहा टक्क्यांनी अधिक असते. विजयादशमीला झेंडूला घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये भाव मिळेल, अशी उत्पादकांना अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा लागवड कमी झाली. विहिरींना जेमतेम पाणी आहे. घाऊकला ५० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला तरच फुलशेती परवडेल, असं शेतकरी सांगत आहेत. 


नाशिकच्या फुलबाजारचा इतिहास 

नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील गणेश वाडी परिसरात हा फुलबाजार भरत असतो. याच परिसरात मेनरोड, सराफ बाजार लागूनच गोदावरी नदी वाहत असते. नाशिकला मंदिराचा वारसा असल्याने गोदाकाठावर अनेक मंदिरे आजही सुस्थितीत उभी आहेत. त्यामुळे साहजिकच पूजा विधीसाठी फुल वाहण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यामुळे याच गोदाकाठावर फुलबाजार सजल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे फुलबाजारचा इतिहास अनेक वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे नाशिकवर अनेक वर्ष मुगलांचे वर्चस्व होते. त्या काळात हा परिसर गुलाब, शेवंती आणि निशीगंधाच्या बागांनी बहरलेला होता. या बागांमुळे गुलशनाबाद अशी शहराची ओळख निर्माण झाल्याचा इतिहास सांगितला जातो. मात्र अनेकदा हाच फुलबाजार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे स्थानिक सांगतात. याच फुलबाजारामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असून पहाटेपासून फुलबाजारत लगबग पाहायला मिळत असते. 


पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Latest News Employment of thousands of women from flower market of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.