Join us

निर्यात खुली झाल्याची चर्चाच, आज राज्यभरात कांद्याला काय बाजारभाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 7:03 PM

निर्यात खुली झाल्याच्या चर्चेनंतर आज कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत लागू राहील असे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा मावळल्या आहेत. शिवाय निर्णयाबाबत सरकारामध्येच संभ्रम असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शिवजयंती दिनी काहीसा चांगला बाजारभाव मिळाल्यानंतर पुन्हा जीएस थे परिस्थिती येऊन ठेपली आहे. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीमध्ये सरासरी 1650 रुपये भाव मिळाला. या बाजार समितीत जवळपास 08 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 8 हजार 347 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती 5 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 350 रुपये मिळाला तर सरासरी 1675 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीत 10 हजार 300 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 900 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1650 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 8 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1700 दर मिळाला. नाशिक बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 1585 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1700 दर मिळाला.

राज्यातील कांदा बाजारभाव पुणे बाजार समितीत केवळ 8 हजार 226 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 800 रुपये दर मिळाला. आणि सरासरी दर देखील 1600 रुपये दर मिळाला. मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये आज लाल कांद्याची 9 हजार 707 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 1850 दर मिळाला.छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 1135 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 800 रुपये तर सरासरी केवळ 1400 रुपये दर मिळाला.

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/02/2024
कोल्हापूर---क्विंटल341770025001600
अकोला---क्विंटल240120020001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल113580020001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9707150022001850
खेड-चाकण---क्विंटल400150018001650
सातारा---क्विंटल103150022001800
राहता---क्विंटल33230021001300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4335100030101600
सोलापूरलालक्विंटल781930033001900
येवला -आंदरसूललालक्विंटल500035019001675
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल61840019001150
लासलगावलालक्विंटल834780019521650
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1030090019011650
जळगावलालक्विंटल108250018751187
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल500086018401550
नागपूरलालक्विंटल1000180025002325
नंदूरबारलालक्विंटल54160019001700
सिन्नरलालक्विंटल114030019361750
सिन्नर - नायगावलालक्विंटल23250020001850
कळवणलालक्विंटल290070020001600
संगमनेरलालक्विंटल360720025011350
चांदवडलालक्विंटल5000100019411720
मनमाडलालक्विंटल340030017211500
जामखेडलालक्विंटल88620028001500
सटाणालालक्विंटल311030017551530
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल354050019001600
यावललालक्विंटल2050490770640
दिंडोरी-वणीलालक्विंटल515890016851250
देवळालालक्विंटल248050021001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल75050024001450
पुणेलोकलक्विंटल822680024001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल27380012001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1900140019221750
मलकापूरलोकलक्विंटल22090017001300
कामठीलोकलक्विंटल6100020001500
कल्याणनं. १क्विंटल3120018001500
नागपूरपांढराक्विंटल1000180025002325
नाशिकपोळक्विंटल158560021001700
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल800050020211700
रामटेकउन्हाळीक्विंटल4180020001900

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदा