Join us

Mango Export : लासलगाव कृषकमधून अकरा देशांत सहाशे टन आंब्याची निर्यात, कुठल्या आंब्याला मागणी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 1:07 PM

Mango Export : लासलगाव येथील कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे.

Mango Export : एप्रिल महिन्यात आंब्याच्या हंगामाची (Mango season) भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही प्रतीक्षा असते. दरवर्षी भारतातून विदेशात ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते, त्यात महाराष्ट्राचा वाटा मीठा आहे. यंदा लासलगाव (Lasalgaon) येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे. यातून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ३१ जूनपर्यंत एक हजार टनांपर्यंत निर्यात होण्याचा अंदाज आहे. दूसरीकडे यंदाही अवकाळीचा फटका बसल्याने त्याचा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या १ एप्रिल रोजी यंदाच्या निर्यात हंगामाला (mango Export) प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील मराठवाडा, रत्नागिरी, देवगड येथील आंब्यासह कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेर, तेलंगणा, गुजरात या राज्यांतील आंबालासलगाय येथून निर्यात केला जात आहे. निर्यातीची प्रक्रिया ३१ जूनपर्यंत चालणार आहे. यंदा अवकाळीचा फटका बसल्याने त्याचा निर्यातीवर परिणाम होताना दिसून येत आहे.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क देशांत निर्यात

हवाई आणि समुद्रामार्गे केल्या जाणाऱ्या निर्यातीमध्ये महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील आधा प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिको, लॉस एंजिल्स, शिकागों, न्यू जर्सी, हृगुस्टन आदी ठिकाणी पाठविला जातो. गतवर्षी एकट्या अमेरिकेत लासलगाव येथील कृषकमधून सुमारे एक हत्तार टन आंब्यांची निर्यात झाली होती.आंब्याची चव टिकून३१ ऑक्टोबर २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उ‌द्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्रात आंब्यांची साठवणूक केली जाते. याठिकाणी गॅमा किरणांचा ४०० ते ७०० से मात्रा विकिरणचा आंब्यावर मारा केला जात असल्याने आंबा पिकण्याची क्रिया लांबते. शिवाय कोचीतील कीड नष्ट होते. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होत असल्याने महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील आंबा येथून निर्यात केला जातो.

या आणि इथे होते आंब्यांची निर्यातआंबा निर्यातीमध्ये हापूस, अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, देगनपल्ली, लंगडा, चौसा या जातीच्या आंब्याची निर्यात होत असते. तर प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेसिया, दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क, कैलिफोर्निया, सॅन फ्रान्सिसको, नॉस एंजिल्लर, शिकगो, न्यू जर्सी, हह्युस्टन आदी देशांमध्ये मागणी असते. 

न्यूझीलंडच्या बाजारपेठेत आंबादक्षिण कोरिया आणि जपानच्या नियांतीला परवानगी मिळाली असून न्यूझीलंड बाजारपेठेतही भारतातील आंबा आण्यास सुरुवात झाली आहे. ऐन कोरोना काळातहीं अपान आणि दक्षिण कोरियात प्रत्येकी ५० टन असे शंभर टन आणि युरोपियन व अन्य देशांसाठी २०० टन ध निर्यात करण्यात आली होती.

टॅग्स :आंबाशेतीशेती क्षेत्रनाशिक