Join us

सकाळ सत्रात उन्हाळ कांदा दरात घसरण, लासलगाव-विंचुर  बाजार समितीत असा भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 12:36 PM

आज सकाळच्या सुमारास विंचूर उपबाजार समितीत उन्हाळ कांद्याचे 9 हजार 100 क्विंटल आवक झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील काही बाजार समित्या मध्ये लिलाव बंद आहेत. हमाल मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्हींसंदर्भात तोडगा निघाला नसल्यामुळे लिलाव ठप्प आहेत. मात्र याचा फटका कांदा दराला बसला असून कांदा दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. 

आज सकाळच्या सुमारास विंचूर उपबाजार समितीत उन्हाळ कांद्याचे 9 हजार 100 क्विंटल आवक झाली आहे. या ठिकाणी कमीत कमी सातशे रुपये तर सरासरी 1350 रुपये दर मिळाला. दरम्यान काल याच बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 20000 क्विंटल आवक झाली होती या ठिकाणी कमीत कमी 600 आणि सरासरी 1375 रुपये दर मिळाला होता त्यानुसार आज पंचवीस रुपयांची घसरण झाल्याचा दिसून आले.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. दररोज हजारो क्विंटल कांदा या बाजार समिती दाखल होत असतो. सद्यस्थितीत केवळ उन्हाळ कांद्याची आवक होत असली तरी शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन येत असतात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसला तरी कांद्याची आवक चांगली होत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून माथाडी मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्ही संदर्भात सर्व मान्य तोडगा निघाला नसल्यामुळे लासलगाव बाजार समिती सहकारी बाजार समितीमध्ये लिलाव पूर्ण थप्प झाले आहेत. त्यामुळे बाजार समितीत कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे कांदा दरात देखील घसरण पाहायला मिळत आहे.

सकाळच्या सत्रातील बाजार भावदरम्यान आज दुपारी सव्वा बारा पर्यंत केवळ तीन बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाल्याचे दिसून आले. पुणे पिंपरी बाजार समितीत लोकल कांद्याला बाराशे पन्नास रुपये दर मिळाला पुणे मोशी बाजार समिती केवळ 850 रुपये दर मिळाला तर लासलगाव विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला तेराशे पन्नास रुपये दर मिळाला.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिक