Flowers Market : आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर फुलांचे दर तेजीत आहेत. यंदा उत्पादनात घट झाल्याने फुलांच्या किमती वधारल्या आहेत. वाढलेली मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे फुलांचे दर वधारले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी सजावट आणि पूजेसाठी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. सद्यस्थितीत आवक घातल्याचे चित्र असून बाजारात मागणी वाढली आहे. विशेषतः गणेशोत्सव काळात सजावट आणि पूजेसाठी फुलांची मागणी सर्वाधिक असते. सजावटीसाठी लागणाऱ्या जास्वंद, मोगरा, गुलाब यांसारख्या फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
असे आहेत हारांचे दर
झेंडू हार : १० रुपयांपासून सुरुवात (लहान आकारापासून ते मागणीनुसार) लिली : १० रुपयांपासून सुरुवात (लहान आकारापासून ते मागणीनुसार) शेवंती : ३० रुपयांपासून सुरुवात (आकारापासून ते मागणीनुसार) मोगरा, गुलाब, लिली या फुलांनी भाव खाल्ला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फुलांचे भाव वाढले आहेत. पाऊस समाधानकारक झाला असला तरी फुलांचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त आहे. परिणामी, सुरुवातीपासूनच दर वाढले आहेत.
सध्याचे दर तसेच गणेशोत्सव काळातील वाढीव दर
सध्याचा दर गणेशोत्सव
पिवळा झेंडू २०० रुपये कॅरेट ३०० ते ४०० रुपये दर
जास्वंद १० रुपये वाटा ५० ते ६० रुपये दर
लिलीचे फूल १५ रुपये जुडी ४० ते ५० रुपये
सर्व गुलाब ३० रुपये १२ नग ४० ते ६० रुपये जुडी (मागणीनुसार)
शेवंती १०० रुपये किलो २०० ते ३०० रुपये किलो ( मागणीनुसार)
तुळशी १० रुपये वाटा ३० ते ४० रुपये वाटा
दुर्वांची जुडी २ ते ३ रुपये जुडी ६ ते ७ रुपये जुडी
मोगरा २०० ते ३०० रुपये किलो ५०० ते ६०० रुपये किलो
बेलाची पाने ७० ते ८० रुपये वाटा १०० रुपये वाटा