Lokmat Agro >बाजारहाट > Fodder : मुरघास, मक्याचा हिरवा चारा, ज्वारीची पेंढी खरेदी करायचीय, इथे साधा संपर्क

Fodder : मुरघास, मक्याचा हिरवा चारा, ज्वारीची पेंढी खरेदी करायचीय, इथे साधा संपर्क

Latest news Fodder available for sale in 5 talukas of Chhatrapati Sambhajinagar district | Fodder : मुरघास, मक्याचा हिरवा चारा, ज्वारीची पेंढी खरेदी करायचीय, इथे साधा संपर्क

Fodder : मुरघास, मक्याचा हिरवा चारा, ज्वारीची पेंढी खरेदी करायचीय, इथे साधा संपर्क

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये पशुपालकांकडे विक्रीसाठी चारा उपलब्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये पशुपालकांकडे विक्रीसाठी चारा उपलब्ध आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या पाणी आणि चाऱ्याची टंचाई वाढली असून चाऱ्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील काही पशुपालकांकडे चारा उपलब्ध असून ज्या शेतकऱ्यांना चारा खरेदी करावयाचा आहे, अशा शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधून चारा खरेदी करता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 5 तालुक्यामध्ये सध्यस्थितीत विक्रीसाठी काही पशुपालकांकडे कडबा, मुरघास तसेच मक्याची हिरवी वैरण उपलब्ध आहे. याबाबतची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामधे संबधीत पशुपालकांचे नंबर देण्यात आलेले आहे. तसेच इतर तालुक्यामधून चाऱ्यासाठी जास्तीच्या पशुपालकांची मागणी आल्यास थेट संपर्क साधून चारा खरेदी करता येणार आहे. 

दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजी नगर,  फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आदि तालुक्यातील पशुपालकांकडे चारा उपलब्ध आहे. यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात तीन पशुपालकांकडे जवळपास 1380 मीटर चार उपलब्ध आहे. तर फुलंब्री तालुक्यात एक पशुपालकाकडे 350 मेट्रिक टन चारा, गंगापूर तालुक्यात 09 पशुपालकांकडे 51 मेट्रिक टन, खुलताबाद तालुक्यात 13 पशुपालकांकडे 74 मेट्रिक टन तर सिल्लोड तालुक्यात एका पशुपालकाकडे 500 मेट्रिक टन असा 2355 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. 

कसे आहेत दर?

यामध्ये ज्वारी, मुरघास, मका आदि पिकांचा चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात मुरघास 4 हजार रुपये मेट्रिक टन, तर मक्याचा हिरवा चारा 2500 रुपये प्रती टन, ज्वारीची प्रती पेंढी 25 रुपये असा दर लावण्यात आला आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार संबंधित चाऱ्याच्या किमती देखील देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. इथे साधा संपर्क 

Web Title: Latest news Fodder available for sale in 5 talukas of Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.