Join us

महाराष्ट्रातून पहिल्यांदाच डाळींबाची सवारी अमेरिकेला, तब्बल चौदा टनांची निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 12:27 PM

राज्यातून पहिल्यांदाच अमेरिकेत १४ टन डाळिंब निर्यात करण्यात आले आहे.

- नितीन चौधरी 

शेतकऱ्यांनी 'भगवा' आता थेट अमेरिकेत फडकावला आहे. अर्थात हा भगवा डाळिंब आहे. राज्यातून पहिल्यांदाच अमेरिकेत डाळिंब निर्यात करण्यात आले आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांना किमान २५ ते ५० टक्के ज्यादा दर मिळण्याची आशा आहे. नाशिक, फलटण, सांगोला परिसरातून १४ टन डाळिंब अर्थात ४,२५८ बॉक्स जहाजातून अमेरिकेत पाठविण्यात आले.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या डाळींब उत्पादकांपैकी एक आहे आणि आता जगातील डाळिंब निर्यातीत आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. युरोपीय महासंघ, आखाती देश आणि आशियाई बाजारपेठांमध्ये वाढत असलेला भारत हा एक प्रमुख देश आहे. त्यातही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळींबाचे उत्पादन घेतले जाते. डाळींबाची पहिली प्रायोगिक तत्वावरील व्यावसायिक खेप समुद्रमार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला रवाना केली. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) झेंड्याखाली आयएफसी सुविधा, एमएसएएमबी, वाशी (नवी मुंबई) येथील आयएनआय फार्म्सद्वारे ही खेप पाठवण्यात आली. 

दरम्यान राज्यातील सांगोला येथील अनार्नेट नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून ही डाळिंब घेतली आहेत. इतर निर्यात बाजारांच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता 20 टक्के आणि देशांतर्गत बाजारपेठेच्या तुलनेत 35 टक्के होता, हे लक्षणीय आहे. हि डाळींब भगवा वाणाची असून याची प्रत आणि चव वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे यापूर्वी संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहाारिन व ओमान यासारख्या देशांमध्ये निर्यात सुरू आहे. या डाळिंबाला अमेरिकेची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी जुलैमध्ये चाचणी घेण्यात आली.

 

https://twitter.com/APEDADOC/status/1762885124536827910

५० ते ५५ दिवस टिकतात डाळिंब

भगवा ही डाळिंबाची जात काढणीनंतर ५० ते ५५ दिवस टिकते. त्यामुळेच समुट मागनि पाठवण्यासाठी टिकवण क्षमता महत्त्वाची ठरली आहे. मुंबईतील बंदरातून अमेरिकेत पोहोचण्यासाठी ३७ दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतरही सुमारे वीस दिवस हे डाळिंब

कॅलिफोर्नियात मोठी मागणी

अमेरिकेतील बाजारात टिकून राहू शकणार आहे. त्यामुळेच ही निर्यात समुद्रामार्गे करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक संजय कदम यांनी सांगितले, हवाई भाडे समुद्र मागपिक्षा किमान सहा ते सात पट जास्त झाले, हेही एक कारण त्यामागे आहे. तसेच अमेरिका डाळिंबांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेतीलच कॅलिफोर्नियातील डाळिंब मोठ्या प्रमाणावर विकले जातात, तसेच स्पेन, इजिप्त, अफगाणिस्तानातून अमेरिकेत डाळिंब विक्रीसाठी येतात. मात्र, भारतातील डाळिंब पहिल्यांदाच अमेरिकेतील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

टॅग्स :शेतीशेतकरीडाळिंबअमेरिका