द्राक्ष अंतिम टप्प्यात असून बाजार समित्यांमध्ये आवक देखील फारशी होत नसल्याचे चित्र आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये केवळ 2149 क्विंटल इतकी आवक झाली. आजच्या बाजार अहवालानुसार द्राक्षाला क्विंटलला सरासरी 3500 रुपये दर मिळत असल्याचे चित्र आहे. आज सर्वाधिक 649 क्विंटलची आवक पुणे बाजार समितीत झाली.
असे आहेत द्राक्ष बाजारभाव
आज 19 मार्चच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दहा बाजार समित्यामध्ये द्राक्षांची आवक झाली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज आवक सर्वसाधारण असल्याचे पाहायला मिळाले. तर सोलापूर बाजार समितीत 2780 नग प्राप्त झाले होते. अहमदनगर बाजार समितीत 103 क्विंटल द्राक्षांची आवक झाली तर सरासरी 3000 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सरासरी 5500 रुपये दर मिळाला. मुंबई - फ्रुट मार्केटमध्ये सरासरी 5000 रुपये दर मिळाला. तर सर्वाधिक 6250 रुपये दर नागपूर बाजार समितीत नाशिकच्या द्राक्षांना मिळाला.
नाशिक द्राक्षांचा बाजारभाव
नाशिक बाजार समितीत सरासरी 2900 दर मिळाला. अमरावती- फळ आणि भाजीपाला बाजार समितीत सरासरी 4000 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत 3500 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजार समितीत सर्वाधिक 6250 रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजार समितीत प्रति किलोला 70 रुपये दर मिळाला.
राज्यातील द्राक्ष बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
19/03/2024 | ||||||
अहमदनगर | --- | क्विंटल | 103 | 2000 | 4000 | 3000 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 52 | 3000 | 8000 | 5500 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 954 | 4000 | 6000 | 5000 |
सोलापूर | लोकल | नग | 2780 | 40 | 160 | 70 |
पुणे | लोकल | क्विंटल | 649 | 2000 | 9000 | 5500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 83 | 3000 | 3500 | 3250 |
नाशिक | नाशिक | क्विंटल | 10 | 1500 | 3800 | 2900 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | नाशिक | क्विंटल | 126 | 3000 | 5000 | 4000 |
जळगाव | नाशिक | क्विंटल | 28 | 3000 | 4000 | 3500 |
नागपूर | नाशिक | क्विंटल | 144 | 4000 | 7000 | 6250 |