Lokmat Agro >बाजारहाट > Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर 

Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर 

Latest News Halad Bajarbhav Expected significant increase in market price for next six years, read in detail  | Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर 

Halad Bajarbhav : हळदीला अच्छे दिन, पुढील सहा वर्षे बाजारभावात लक्षणीय वाढीची अपेक्षा, वाचा सविस्तर 

Halad Bajarbhav : महत्वाचे म्हणजे २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे.

Halad Bajarbhav : महत्वाचे म्हणजे २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Halad Bajarbhav : मागील आठवड्यात हळदीला क्विंटलमागे (Halad Market) सरासरी १३ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्याचबरोबर आवक देखील स्थिर आहे. महत्वाचे म्हणजे २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य १०८१.३४ दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत ७.१९% च्या त्सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी २०३१ पर्यंत १६४०.१३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

हळदीचे जागतिक उत्पादन (Turmeric Production) दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८० टक्के योगदान आहे, त्यानंतर चीन (८ टक्के), म्यानमार (४ टक्के), नायजेरिया (३ टक्के) आणि बांगलादेश (३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. हळदीच्या लागवडीखालील क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतातील सहाव्या क्रमांकावर आहे. पिकाचे क्षेत्रफळ सुमारे १६००० हेक्टर असून त्याचे उत्पादन २१०००० टन आहे. 

महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, चंद्रपूर हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत. मागील आठवड्यात हळदीला सांगली बाजारात ११ हजार ६२५ रुपये, नांदेड बाजारात १३ हजार १२६ रुपये, हिंगोली बाजारात १२ हजार ४१३ रुपये, बसमत बाजारात १२ हजार ३५१ रुपये, तर रिसोड बाजारात १२ हजार ७५५ रुपये दर मिळाला होता. 

 २०२४ ते २०३१ या कालावधीत जागतिक हळदीच्या बाजारपेठेत लक्षणीय दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. २०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य USD १०८१.३४ दशलक्ष इतके होते. आणि अंदाज कालावधीत ७.१९% च्या CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे, २०३१ पर्यंत USD १६४०.१३ दशलक्ष पर्यंत पोहोचेल. २०२४ मध्ये, बाजार स्थिर दराने वाढत आहे आणि प्रमुख भागधारकांनी धोरण अवलंबल्याने, बाजार अंदाजित पातळीवर वाढण्याची अपेक्षा आहे.

(स्रोत- हळद आउटलुक - अहवाल)

Web Title: Latest News Halad Bajarbhav Expected significant increase in market price for next six years, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.