Join us

Halad Market : हळदीची आवक वाढली, मागील आठवड्यात दर कसे होते? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 5:52 PM

Halad Market : मागील आठवड्यातील हळदीचे दर कसे होते, हे जाणून घेऊयात..

Halad Market : मागील आठवड्यातील हळदीची आवक (Halad Market) पाहिली तर राज्यात ३.० टनांपर्यंत झाली. तर बाजार अहवालानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून आवक वाढत असल्याचं दिसून येत आहे. तर मागील आठवड्याचे काही बाजार समित्यांमधील दर पाहिले असता सांगली बाजारात १४ हजार रुपये, नांदेड बाजारात १३ हजार ५३० रुपये, हिंगोली बाजारात १३ हजार ५८ रुपये, रिसोड बाजारात १३ हजार ५०० रुपये असा दर मिळाला आहे.

मागील आठवड्यात सांगली बाजारात (Sangli Halad Market) हळदीची किंमत रु. १४ हजार प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवण्याच्या तुलनेत हळदीच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ११.६८ टक्के व ८.४७ टक्के इतकी वाढ झाली आहे. २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. 

२०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य १०८१.३४ दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत ७.१९% च्या सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी २०३१ पर्यंत १६४०.१३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पो होचेल. हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८०% योगदान आहे, त्यानंतर चीन (८%), म्यानमार (४%), नायजेरिया (३%) आणि बांगलादेश (३%) यांचा क्रमांक लागतो. सन २०२२-२३ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुमारे ८८३०० हेक्टर असून त्याचे उत्पादन ३२३२०० टन इतके होते.

आजचे हळद बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/09/2024
हिंगोली---क्विंटल1651121001430013200
वाशीमलोकलक्विंटल1500122501380012800

(स्रोत- हळद आउटलुक - अहवाल)

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीसांगली