Lokmat Agro >बाजारहाट > Weekly Halad Market : हळद बाजारभावात घसरण, मागील आठवड्यात काय बाजारभाव मिळाला?

Weekly Halad Market : हळद बाजारभावात घसरण, मागील आठवड्यात काय बाजारभाव मिळाला?

Latest news halad market Turmeric market price down, see last week market price | Weekly Halad Market : हळद बाजारभावात घसरण, मागील आठवड्यात काय बाजारभाव मिळाला?

Weekly Halad Market : हळद बाजारभावात घसरण, मागील आठवड्यात काय बाजारभाव मिळाला?

Weekly Halad Market : मागील आठवड्याचे हळदीचे बाजारभाव पाहिले असता बाजारभावात काहीशी घसरण दिसून आली. मात्र..

Weekly Halad Market : मागील आठवड्याचे हळदीचे बाजारभाव पाहिले असता बाजारभावात काहीशी घसरण दिसून आली. मात्र..

शेअर :

Join us
Join usNext

Weekly Halad Market : मागील आठवड्याचे हळदीचे (Last Week Turmeric Market Price) बाजारभाव पाहिले असता बाजारभावात काहीशी घसरण दिसून आली. मात्र एकूण सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता दराचा आलेख उंचावत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात सरासरी १३ हजार ४१९ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

मागील आठवड्यातील हळदीची आवक  (Halad Arrival) पाहिली असता एक प्रमाणात आवक होत आहे. १५ सप्टेंबर रोजी २००० टन तर २२ सप्टेंबर रोजी देखील १००० ते २००० टन या दरम्यान आवक झाली. देशात आणि राज्यात हळदीची आवक स्थिर असल्याचे बाजार अहवालावरून निदर्शनास आले. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ७.२५ टक्के व १४.८५ टक्के इतकी वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात सांगली बाजारात - हळदीची किंमत १३४१९ रुपये प्रती क्विंटल होती. मागील आठवण्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे. नांदेड बाजारात १३ हजार ५०० रुपये, हिंगोली बाजारात १३ हजार ८७ रुपये, वसमत बाजारात १३ हजार ५८७ रुपये, रिसोड बाजारात १३ हजार ५०० रुपये दर मिळाला. 

भारतात हळदीचे ८० टक्के उत्पादन 

हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८०% योगदान आहे, त्यानंतर चीन (८%), म्यानमार (४%), नायजेरिया (३%) आणि बांगलादेश (३%) यांचा क्रमांक लागतो. सन २०२२-२३ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुमारे ८८३०० हेक्टर असून त्याचे उत्पादन ३२३२०० टन इतके होते.


(स्रोत - हळद आउटलुक - अहवाल)

Web Title: Latest news halad market Turmeric market price down, see last week market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.