Join us

Halad Market : हळदीचे दर घसरले, मागील आठवडाभर बाजारभाव कसे होते? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 6:52 PM

Halad Market : मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या (Halad Market0 आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर घट झाली आहे.

Halad Weekly Market : हळद मार्केटमध्ये (Halad Bajarbhav) काहीही पडझड सुरू असून मागील आठवड्यात हळदीचे आवकेत आणि बाजारभावात देखील घसरण झाल्याचे दिसून आलं. बाजार अहवालानुसार मागील आठवड्यात सांगली बाजारात (Sangali Halad Market) हळदीची किंमत १२ हजार ६०१ रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या (Halad Market0 आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर घट झाली आहे. २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मागील आठवड्यात नांदेड बाजारात प्रतिक्विंटल 13 हजार 300 रुपये, हिंगोली बाजारात 12 हजार 601 रुपये, वसमत बाजारात 13 हजार 02 रुपये, रिसोड बाजारात 11 हजार 500 रुपये दर मिळाला. 

सन २०२२-२३ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुमारे ८८ हजार ३०० हेक्टर असून त्याचे उत्पादन ३ लाख २३ हजार २०० टन इतके होते. हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८० टक्के योगदान आहे, त्यानंतर चीन (८ टक्के), म्यानमार (४ टक्के), नायजेरिया (३ टक्के) आणि बांगलादेश (३ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

आजचे बाजारभाव काय आहेत? आज ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी च्या बाजार भाव अहवालानुसार हिंगोली बाजारात हळदीला क्विंटल मागे १२ हजार ४०० तर मुंबई बाजारात १७ हजार रुपये इतका दर मिळाला आणि कालचा बाजार भाव पाहिला असता नांदेड बाजारात क्विंटल मागे १२ हजार ८०० रुपये तर सेनगाव बाजारात १२ हजार रुपये दर मिळाला.

(स्रोत - हळद आउटलुक - अहवाल)

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डसांगलीबाजार