Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market Update : हळदीच्या दर घसरले, मागील आठवड्यात सांगली बाजारात बाजारभाव कसे होते? 

Halad Market Update : हळदीच्या दर घसरले, मागील आठवड्यात सांगली बाजारात बाजारभाव कसे होते? 

Latest News Halad Market Update Turmeric prices down, market price in Sangli market last week  | Halad Market Update : हळदीच्या दर घसरले, मागील आठवड्यात सांगली बाजारात बाजारभाव कसे होते? 

Halad Market Update : हळदीच्या दर घसरले, मागील आठवड्यात सांगली बाजारात बाजारभाव कसे होते? 

Halad Market Update : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या दरात (Turmeric Market) काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं.

Halad Market Update : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या दरात (Turmeric Market) काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं.

शेअर :

Join us
Join usNext

Halad Market Update : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या दरात (Turmeric Market) काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र दुसऱ्या आठवड्यात बाजारभावाचा आलेख चढता दिसून येत आहे. त्यानुसार १४ हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. मात्र आवक काहीशी कमी अधिक असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात कसे बाजारभाव होते, ते पाहुयात.... 

मागील आठवड्यात सांगली बाजारात हळदीची (Sangli Halad Market) किंमत रुपये १४ हजार ५८८ प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १०.४७ टक्के व ४४.९६ टक्के इतकी वाढ झाली आहे.  तर बाजारभाव नांदेड बाजारात १२ हजार ५०० रुपये, हिंगोली बाजारात १२ हजार १५९ रुपये, वसमत बाजारात १२ हजार ८७४ रुपये तर रिसोड बाजारात १२ हजार २५० रुपये दर मिळाला. 

२०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. २०२१ मध्ये जागतिक हळदीच्या बाजारपेठेचे मूल्य १०८१.३४ दशलक्ष डॉलर्स होते आणि अंदाज कालावधीत ७.१९ टक्के च्या सीएजीआरने विस्तार होण्याची अपेक्षा आहे, जी २०३१ पर्यंत १६४०.१३ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत. हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे ११ लाख टन आहे. जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ८०% योगदान आहे, त्यानंतर चीन (८%), म्यानमार (४%), नायजेरिया (३%) आणि बांगलादेश (३%) यांचा क्रमांक लागतो. सन २०२२-२३ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुमारे ८८३०० हेक्टर असून त्याचे उत्पादन ३२३२०० टन इतके होते.


(स्रोत - हळद आउटलुक अहवाल)

Web Title: Latest News Halad Market Update Turmeric prices down, market price in Sangli market last week 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.