Join us

Harbhara Bajarbhav : हरभऱ्याची आवक घटली, मागणी वाढली, क्विंटलला काय बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:03 PM

Harbhara Market : अशा परिस्थितीत हरभऱ्याची आवक कमी झाली असून सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढली. 

अमरावती : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही. सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांजवळ कमी असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांत मागणी वाढली. 

नवीन हरभऱ्याला अवधी आहे. त्यामुळे हरभऱ्याला सोमवारी उच्चांकी ७,२७२ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने गतवर्षी हरभऱ्याच्या सरासरी केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ४,८९२ रुपये क्विंटल असा जाहीर केला आहे. दीड महिन्यात नवे सोयाबीन बाजारात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४१०० ते ४१७७ रुपये भाव मिळाला आहे. यामध्ये उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.

मागील काही दिवसांचे बाजारभाव 

मागील काही दिवसांचे बाजारभाव पाहिले असता 15 जुलै रोजी 6000 ते 6350 रुपये प्रति क्विंटल, 19 जुलै रोजी 6000 ते 6400 रुपये प्रति क्विंटल, 24 जुलै रोजी 6300 ते 6560 रुपये प्रति क्विंटल, 31 जुलै रोजी 06 हजार 200 रुपये ते 6532 रुपये प्रतिक्विंटल, 05 ऑगस्ट रोजी 6650 रुपये ते 6969 रुपये प्रतिक्विंटल, 07 ऑगस्ट रोजी 6 हजार 700 ते 7 हजार 40 रुपये प्रतिक्विंटल, 12 ऑगस्ट रोजी 7000 रुपये ते 7 हजार 272 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

आजचे बाजारभाव 

आज बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 05 हजार 809 क्विंटलची आवक झाली आहे. अहमदनगर बाजारात लोकल हरभऱ्याला 06 हजार रुपये, अकोला बाजारात काबुली हरभऱ्याला 11 हजार रुपये, अमरावती बाजारात लोकल हरभऱ्याला 06  हजार 831 रुपये, बीड बाजारात लाल हरभऱ्याला 06  हजार 890 रुपये, बुलढाणा बाजारात चाफा हरभऱ्याला 6576 रुपये, धाराशिव बाजारात काट्या हरभऱ्याला 06 हजार 800 रुपये, लातूर बाजारात सर्वसाधारण हरभऱ्याला 06  हजार 908 रुपये, नागपूर बाजारात लोकल हरभऱ्याला 6928 रुपये, पुणे बाजारात लाल हरभऱ्याला 06 हजार 700 रुपये असा दर मिळाला

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डशेतकरी