Harbhara Bajar Bhav : मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष मार्च २०२४-२५ (१९ मार्च २०२५ पर्यंत) मधील हरभऱ्याची आवक (Harbhara Market) मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली दिसून येत आहे. मार्च २०२५ मध्ये ती २.८ लाख टन इतकि आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ४.५ लाख टन इतकी होती. यंदा एप्रिलमधील पुढील काही दिवसांमध्ये ५ हजार ६०० ते ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे.
हरभरा हे रब्बी पिक (Harbhara Rabbi Crop) असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे ११०.४ लाख टन होण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन २६.९० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये २८.२ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर २०२४ पासून हरभऱ्याच्या किंमती कमी होत आहेत. सध्याच्या किंमती भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या एप्रिल मधील सरासरी किंमती पुढील प्रमाणे पाहता येतील. यात एप्रिल एप्रिल २०२२ मध्ये ४ हजार ५९७ रुपये प्रतिक्विंटल, एप्रिल २०२३ मध्ये ४ हजार ७८७ रुपये प्रति क्विंटल, एप्रिल २०२४ मध्ये ५ हजार ४३ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता.
अशा असतील किंमती
यंदाच्या रब्बी हंगाम २०२४-२५ साठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ५ हजार ६५० रुपये क्विंटल इतकी आहे. तर मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात कमी झालेली आहे. तर यंदा एप्रिलमधील पुढील काही दिवसांमध्ये ५ हजार ६०० ते ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे.
Tur Soyabean Market : पुढील पंधरा दिवस तूर, सोयाबीनचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर