Join us

Harbhara Bajarbhav : बुलढाणा बाजारात हरभऱ्याला क्विंटलमागे 'इतका' दर, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 2:03 PM

Harbhara Bajarbhav : यंदा शासकीय गोदामात आणि शेतकऱ्यांच्या घरातही हरभरा नसल्याने ही भावातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

जळगाव :जळगाव बाजारात आवक कमी आणि मागणी वाढल्याने हरभरा (Harbhara Bajarbhav) सध्या तेजीत आहे. ५४९० रुपये हमीभाव असलेला हरभरा काही दिवसांपूर्वी ६७०० रुपये प्रतिक्विंटल होता. आता आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हरभरा थेट आठ हजारी झाला आहे. शासनाकडून हरभऱ्याला ५४९० रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव घोषित करण्यात आला होता; परंतु रब्बी हंगामात पिकलेला हरभरा खरेदी करण्यासाठी यंदा 'नाफेड' मार्फत केंद्रच सुरू झाले नाही. 

सुरुवातीला हरभरा खुल्या बाजारात ५,२०० रुपये प्रतिक्विंटलने विकला गेला. त्यानंतर त्यात हळूहळू दरवाढ होत गेली. महिन्यापूर्वी हरभरा ६,७०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात होता. त्यात काही दिवसांपूर्वी तो ७००० रुपयांवर गेला. नंतर हा भाव पुन्हा खाली आला होता. त्यात चढउतार होत गेले. आता गेल्या १५ दिवसांपासून हरभरा ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. 

आज रोजी किरकोळ बाजारात ७६०० रुपये प्रतिक्विंटलने हरभरा खरेदी केला जात आहे; परंतु शेतकऱ्याच्या घरात मात्र या दरवाढीचा फायदा घेण्यासाठी हरभरा नाही, अशी स्थिती आहे. आता पोळ्यापासून सणासुदीला सुरुवात होत आहे. यात हरभऱ्याला (चना डाळ) मागणी वाढली आहे. त्यामुळे हरभरा आठ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. सणासुदीमुळे ही दरवाढ आता कमी होण्याची शक्यता नाही, त्यात यंदा शासकीय गोदामात आणि शेतकऱ्यांच्या घरातही हरभरा नसल्याने ही भावातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

आज रोजीचे हरभरा बाजारभाव 

आज 30 ऑगस्ट रोजीचे हरभरा बाजार भाव पाहिले असता पुणे बाजारात सर्वसाधारण हरभऱ्याला क्विंटलमागे सरासरी ०७ हजार ७०० रुपये दर मिळाला. तर चोपडा बाजारात चाफा हरभऱ्याला क्विंटल मागे ०५ हजार ४०० रुपये, कल्याण बाजारात हायब्रीड हरभऱ्याला ०७ हजार ७५० रुपये, चोपडा बाजारात जंबु हरभऱ्याला १० हजार ५०० रुपये, अकोला बाजारात लोकल हरभऱ्याला ०७ हजार ४०० रुपये, तर अमरावती बाजारात ०७ हजार ३७५ रुपये आणि बुलढाणा बाजारात काबुली हरभऱ्याला सर्वाधिक ११ हजार रुपयांचा दर मिळाला.

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डजळगावशेती