Harbhara Market : देशातील शेतकऱ्याचां हरभरा विक्रीसाठी (Harbhara Market) बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून Harbhara Import From Austrelia) 26255.850 मे.टन हरभरा आयात केला आहे. 11 फेब्रुवारी रोजी मुंद्रा बंदरावर ऑस्ट्रेलियन जहाज दाखल होत आहे. त्यामुळे पुढील काळात हरभऱ्याचे दर (Chana Market) दबावात राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कमीत कमी 4 हजार 825 रुपये तर सरासरी 7 हजार 800 रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर मिळतो आहे.
यंदा ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचे चांगले उत्पादन (Harbhara Production) झाले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कमी दरातील हरभरा खरेदीवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे. आणि म्हणूनच देशांमध्ये येत्या काळातील हरभऱ्याचे दर दबावात राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील हरभरा येण्यास अजून काही दिवसांचा कालावधी आहे. काही निवडक बाजारात हरभरा येतो आहे. अशातच ऑस्ट्रेलियातून 26255.850 मे.टन हरभरा आयात केला आहे. पुढील दोन दिवसांत आयात केलेला हरभरा भारतात दाखल होणार आहे.
दुसरीकडे पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हरभरा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत 54.40 रुपये प्रति क्विंटल आहे. मागील आठवड्याच्या तुलतेन राष्ट्रीय पातळीवर हरभऱ्याच्या आवकेमध्ये 28.59 टक्के वाढ झालेली दिसून येत आहे.
या आठवड्यातील लातूर बाजारपेठेमधील हरभऱ्याच्या किंमती मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात लातूर बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल 5 हजार 556 रुपये, अमरावती बाजारात 6 हजार 84 रुपये, हिंगणघाट बाजारात 5 हजार 439 रुपये, खामगाव बाजारात 5 हजार 109 रुपये, उदगीर बाजारात 5 हजार 556 रुपये दर मिळाला.
एवढी प्रचंड प्रमाणात आयात करून देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हरभऱ्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले गेले आहेत. देशातील शेतकऱ्यांना हरभरा व इतर पिकांचे भाव प्रचंड प्रमाणात आयात करून MSP पेक्षा जास्त होऊच द्यायचे नाही, हे सरकारी धोरण देशातील शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार आहे.
- निलेश शेडगे, स्वतंत्र भारत पक्ष, अहिल्यानगर