Join us

Harbhara Market : ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये हरभरा बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 2:36 PM

Harbhara Market : यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा उत्पादन, बाजारभाव कसे राहतील, ही सविस्तर पाहुयात..

Harbhara Market : भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन (Harbhara Production) सुमारे १२१.६ लाख टन होण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच असल्याचे दिसून येते. तर बाजारभाव आजमितीस ७ हजार रुपयांपर्यंत (Gram Market) पोचले आहेत. तर आगामी डिसेंबरचा विचार करता हे बाजारभाव कसे राहतील, हे पाहुयात.. 

हरभरा हे रब्बी पिक (Harbhara Bajarbhav) असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी तर मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष सप्टेंबर २०२३-२४ मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली दिसून येत आहे. सप्टेंबर २०२४ (२२ सप्टेंबर २०२४ पर्यंत) मध्ये ती ०.६ लाख टन इतकि आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ०.७ लाख टन इतकी होती.

हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारे डाळवर्गीय पिक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे ९० टक्के योगदान देतात. भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ७०- ७५ टक्के आहे, भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. देशभरात हरभऱ्याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो.

यंदाचे हरभरा उत्पादन 

महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन २९.७ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये २८.६ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२२ पासून हरभऱ्याच्या किंमती वाढत आहेत. ऑगस्ट २०२३ नंतर, त्या भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत.

हरभरा बाजारभाव .. 

मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या ऑक्टोबर ते डिसेंबर मधील सरासरी किंमती ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ : ४,५६९ रुपये क्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ : ४,४५० रुपये क्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ : ५,७३६ रुपये क्विंटल अशा होत्या. तर सध्याच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान - आधारभूत किंमत ५४४० रूपये क्विंटल आहे. मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत  २०२३-२४ मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात कमी झालेली आहे. 

संकलन : स्मार्ट प्रकल्प अंतर्गत माहिती विश्लेषण जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे.  

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीमार्केट यार्ड