Join us

Onion Market : पेन बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 5:16 PM

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 35 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली.

आज दुपारी पावणेपाच वाजेपर्यंत राज्यभरात कांद्याची 88 हजार क्विंटलपर्यंत झाली. रोज कांद्याची दीड लाखाहून अधिक कांद्याची आवक होत असते. आज महिन्याचा शेवटचा दिवस असून लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये 1375 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1250 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला. त्यानुसार आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला? हे सविस्तर पाहुयात.... 

आज 29 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 35 हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. कराड बाजारात हलवा कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 13 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. तर कांद्याला सरासरी 1150 रुपये दर मिळाला. आज लाल कांद्याला पेन बाजारात सर्वाधिक 3000 रुपयांचा दर मिळाला. 

तसेच लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. तर याच लोकल कांद्याला कामठी बाजार समितीत 2000 रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. 

तर आज उन्हाळ कांद्याला लासलगाव विंचूर बाजार समितीत 1400 रुपये, कळवण बाजार समितीत 1300 रुपये, पिंपळगाव(ब) - सायखेडा बाजार समितीत 1275 रुपये, देवळा बाजार समितीत 1350 रुपये तर येवला बाजारात 1250 रुपये दर मिळाला. 

असे आहेत कांदा दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/04/2024
कोल्हापूर---क्विंटल252060019001200
अकोला---क्विंटल1060100015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17792001300750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल820100018001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9221120017001450
खेड-चाकण---क्विंटल650100015001300
सातारा---क्विंटल195120016001400
राहता---क्विंटल222920016001200
कराडहालवाक्विंटल15060014001400
सोलापूरलालक्विंटल1303510021001150
धुळेलालक्विंटल238720012001050
जळगावलालक्विंटल13104251127787
नागपूरलालक्विंटल1240100015001375
पेनलालक्विंटल258300032003000
भुसावळलालक्विंटल73100012001100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल240340018001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल932570017001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल4375001200850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3600120013901250
जामखेडलोकलक्विंटल10392001600900
इस्लामपूरलोकलक्विंटल3580016001100
कामठीलोकलक्विंटल4150025002000
कल्याणनं. १क्विंटल3120014001300
नागपूरपांढराक्विंटल1000110015001400
येवलाउन्हाळीक्विंटल500010112751250
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल820070016401400
कळवणउन्हाळीक्विंटल1360040018701300
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल358070014211275
देवळाउन्हाळीक्विंटल315020016851350
टॅग्स :कांदाशेतीनाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र