भुसावळ : शोभिवंत रोपांपेक्षा ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांच्या लागवडीसाठीच (Tree plantation) भुसावळकरांनी यंदा पसंती द्यायला सुरुवात केली आहे. गुलाब (Rose Plant), मोगरा, मधुकामिनी, जास्वंदसह अन्य फुलझांडाना सर्वाधिक पसंती असताना 'बोन्साय'च्या खरेदीसाठी मोजकाच ग्राहक पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. शहरात काही खासगी रोपवाटिका आहेत. सध्या या रोपवाटिकांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.
यंदा पाऊस (rain) चांगला होत असल्याने ग्राहकांनी फुलझाडांपेक्षा नीम, पिंपळ, आंबा, नारळ, सप्तपर्णी, वड यासारख्या रोपांना प्राधान्य दिले आहे. त्यातल्या त्यात डोक्यावर गेलेल्या वृक्षांची लागवड करण्याला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. याबाबत फुले रोपवाटिका व्यावसायिक सुरेश पाटील म्हणाले की, यंदा जास्त प्रमाणात सावली देणारे ऑक्सिजन देणाऱ्या लिंब वड या झाडांना मागणी आहे. फुल झाडांमध्ये गुलाब एकझोरा, रोड साईडला लावण्यात येतात अशा झाडांना मागणी आहे. सप्तपर्णीला मागणी नाही.
फुलझाडांच्या विक्रीत 'गुलाब' जोरात आहे. पांढरा, लाल, केशरी, पिवळ्यासह विविध रंगात उपलब्ध असलेला गुलाब सध्या भाव खाताना दिसत आहे. त्यापाठोपाठ जास्वंद, मोगरा, मधुकामिनी या फुलझाडांना जळगावमध्ये सर्वाधिक मागणी आहे. तसेच पावसाळ्यात झाडाची काडी लावली तरी त्याचे रोप तयार होते. घरात किंवा घरालगतच्या परिसरात छोटीशी बाग असावी म्हणून जागेनुसार रोप खरेदी केली जात आहे. एका झाडाच्या असंख्य प्रजाती असल्याने फुलझाडांच्या रंगांमध्ये फरक असतो. ५० ते ६० प्रकार निव्वळ फुलझाडांचे नर्सरीत बघायला मिळतात.
कोणती झाडे लावावीत?
इनडोअर : बांबू वनस्पती, मनी प्लांट, लॅव्हेंडर, लिली, स्नेक प्लांट, तुळशी, डॅफोडील, रबर प्लांट, जेड, चमेली, कोरफड, गोल्डन पोथोस आदी.
आऊटडोर : केळी, आंबा, बरगड, पिंपळ, कडुलिंब, गुलमोहर, सुबाबूल, चिंच, कॅज्युरीना, बदाम, बाबुल, जॅकरांडाचे झाड, बाभूळ, भोर, रेन ट्री, टेम्पल ट्री. फाउंटन ट्री, अशोक, कॅसिया, इन डायन गुसबेरी आदी.
फुले रोपनिहाय दर
यात गुलाबाला अधिक मागणी असून गुलाबाचे रोप 50 रुपयांना आहे. त्यानंतर मधुकामिनी 100 ते 300 रुपये प्रती रोप, जास्वंद 60 ते 80 रुपये, पाम 150 ते 1200 रुपये, लिली 90 ते 100 रुपये, वड 100 ते 800 रुपये, सायकस 350 रुपयांना रोप आहे. यात पाम रोप महाग असल्याचे चित्र आहे.