Join us

Cotton Future Market : ऑक्टोंबर-डिसेंबर 2024 मध्ये कापसाचे बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 7:40 PM

Agriculture News : येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 मध्ये कापसाचे बाजारभाव कसे असतील हे पाहुयात..

Cotton Market : कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि युएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी 25 टक्के वाटा भारताचा आहे. 

मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत मागील वर्षांच्या तुलनेत 2023-24 मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयात व निर्यातीमध्ये सरासरी सहा टक्के वाढ झाली आहे.

कापूस उत्पादनाचे गणित

USDA-FAS च्या अंदाजानुसार विपणन वर्ष 2024,25 मध्ये भारतातील कापूस उत्पादन 25.4 दशलक्ष 480 Ib bales आहे. शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळवतील या अपेक्षामुळे पेरणी केलेल्या 12.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाले आहेत. कापणीच्या क्षेत्रफळाच्या वाढीमुळे 2024-25 मध्ये जागतिक उत्पादन 115.9 दशलक्ष गाठीपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे एकूणच गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टिकोन सुधारल्यामुळे 2024-25 हे पण वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आहे.

मागील आणि संभावित बाजारभाव पाहुयात...

दरम्यान कापसाच्या बाजारभावाचा आढावा घेतला असता अकोला बाजारपेठेत कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत. मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील कापसाच्या किमती ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 मध्ये 7939 रुपये, प्रतिक्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये 8762 रुपये प्रतिक्विंटल तर ऑक्टोंबर ते डिसेंबर 2023 मध्ये 07 हजार 75 रुपये प्रति क्विंटल अशा दिसून आल्या. तर ऑक्टोंबर ते डिसेंबर 2024 या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे 7000 रुपये ते 8000 रुपये प्रति क्विंटल राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :कापूसकॉटन मार्केटमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती