Join us

Soyabean Bajarbhav : जुलै- सप्टेंबर 2024 ला सोयाबीन बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 3:09 PM

Future Price Soyabean : जुलै आणि सप्टेंबर या कालावधीत सोयाबीनचे बाजारभाव कसे असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

Future Price Soyabean :   सोयाबीन (Soyabean) हे देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखलं जाते. सध्या स्थितीत सोयाबीन लागवडीची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. मात्र अद्यापही बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक होत आहे. आजमितीस लातूर बाजार समिती सोयाबीनला सरासरी 4486 रुपये दर (Soyabean Market) मिळाला.

दरम्यान आगामी जुलै आणि सप्टेंबर या कालावधीत सोयाबीनचे बाजारभाव (Soyabean Bajarbhav) कसे असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानुसार जर भारता चा विचार केला तर 2023-24मध्ये सोयाबीनचे उत्पादन 110 लाख टन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी कमी आहे. दुसरीकडे सन 2022-23 मध्ये स्वयंमिलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे चालू वर्षी एप्रिल 23 ते फेब्रुवारी 24 या कालावधीत 19.34 लाख टन सोयाबीन निर्यात झाली आहे मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन निर्यात अधिक झाली आहे. 

तर दुसरीकडे चालू वर्षी नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत 12.8 68 लाख टन सोहळ्या तेलाचे आयात झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचे SEA च्या अहवालातून समोर आला आहे. तर दुसरीकडे मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षाच्या सोयाबीनची मासिक बाजारात आवक ऑक्टोबर महिन्यात जास्त होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून कमी झाली आहे.

मागील तीन वर्षांच्या किमती 

लातूर बाजाराचा विचार केला असता मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी किमती पाहिल्या तर जुलै ते सप्टेंबर 2021 मध्ये 07 हजार 783 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर जुलै ते सप्टेंबर 2022 या कालावधीत 5 हजार 384 प्रतिक्विंटल तर जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये 4 हजार 876 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. 

पुढील चार महिन्याच्या संभाव्य किंमती 

तर यंदा सन 2023-24 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत 04 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र सद्यस्थितीत लातूर बाजाराचा विचार करता केवळ 04 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत आहे. एकूणच मागील चार वर्षातील सोयाबीनच्या किमतीमध्ये कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. त्यानुसार जु ते सप्टेंबर 2024 या कालावधीत 04 हजार 400 रुपये ते 5200 रुपये प्रति क्विंटल अशा संभाव्य किमती राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :सोयाबीनशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड