रावसाहेब उगले
नाशिक : इस्त्रायल आणि हमास युद्धाची झळ नाशिकच्या निर्यातक्षम द्राक्ष वाहतुकीला बसली आहे. हमासच्या गाझापट्टीवरील हल्ल्यात जहाज उडविल्याने जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक थांबविली आहे. युरोपपर्यंत पोहोचण्यासाठी 15 दिवसांच्या विलंबाचा परिणाम भारतातून युरोपीयन देशात होणाऱ्या द्राक्षनिर्यातीवर झाला आहे. त्यामुळे राज्यातील निर्यातदारांनी द्राक्ष खरेदी बंद केली आहे. केप ऑफ गुड होपमार्गे युरोप, आशियादरम्यान पर्यायी मार्गाने माल कोठे वितरित केला जाईल यावरच वाहतूक अवलंबून आहे.
पिक सीझनमध्ये कंटेनरची कमतरता
कंटेनर आणि तेलवाहू जहाजांना पुरविल्या जाणाऱ्या मैत्रिपूर्ण राष्ट्रांच्या लष्करी जहाजांना एस्कॉर्ट करण्यास वेळ लागेल. ही सुखद स्थिती नाही, असे जहाज वाहतूक कंपन्यांचे म्हणणे आहे.
खर्चाचा अतिरिक्त भार
लांब मार्ग आणि युद्ध जोखीम अधिभार यामुळे अतिरिक्त मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. ज्यामुळे खर्चावर अतिरिक्त भार पडेल. वास्तविक, जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात खन्या अर्थनि परिणाम कळणार आहे. गर्दीच्या हंगामात कंटेनरची कमतरता निर्माण होऊ शकते. जहाज वाहतूक कंपन्यांनी लाल समुद आणि सुएझ कालव्याच्या मार्गावरील नवीनतम अपडेटबाबत मेलद्वारे परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. युरोप, दक्षिण युरोप, रशिया आणि जेद्दाह येथे द्राक्ष निर्यातीवर परिणाम होणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. सर्व प्रमुख शिपिंग लाइन्सनी सुएझ कालव्याच्या दोन्ही टोकांना त्यांच्या जहाजांची हालचाल थांबविली आहे.
काय होईल परिणाम?
समुद्रात मालवाहतूक खर्च, विमा प्रीमियम वाढणार आहे. केप ऑफ गुड होपमार्गे माल पाठवण्यास वेळ लागेल. युरोपमध्ये लोह आणि पोलाद, यंत्रसामग्री निर्यातीला फटका बसला वसून इतरही वस्तुच्या निर्यातीच्या आशावादावर पाणी फेरले जाईल, अशी स्थिती आहे. इस्त्रायल - हमास युद्धामुळे एपी मोलेर, एमएसी, सीएमए, सीजीएम आणि हपाग-लेयॉड आदी कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत लाल समुदाचा मार्ग टाळण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, नवीन मार्ग अजून ठरवायचा असून, त्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे कंपन्यांनी निर्यातदारांना कळविले आहे.
सह्याद्री फार्म्सचे संचालक विलास शिंदे म्हणाले की, इस्त्रायल-हमास युद्धामुळे जहाज वाहतूक कंपन्यांनी वाहतूक थांबविली आहे, जे कंटेनर या मार्गावर आहेत त्यांना पुढे पाठवायचे की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. पर्यायी मागनि कंटेनर पाठवायचे ठरल्यास वेळ आणि पैसा लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती नुकसान सोसावे लागेल, हे आताच सांगणे कठीण आहे.
15 दिवसांचा अतिरिक्त वेळ लागणार
सर्व जहाजे, पूर्व आणि पश्चिमेकडे जाणारी म्हणजेच युरोप ते आशिया, भारत आणि आशिया, भारत ते युरोप हे केप ऑफ गुड होपमार्गे मार्गक्रमण करतील. याचा अर्थ येणाऱ्या आणि जाणाऱ्या जहाजांसाठी 12 ते 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ लागणार आहे. लांबच्या प्रवासामुळे द्राक्षे युरोपला 21 ते 25 दिवसांऐवजी 30 ते 35 दिवसांत पोहोचतील. पण, खरी अडचण न्हावा शेवा येथे जहाजे येण्यास उशीर होईल. ज्यात नेहमीपेक्षा काही अधिक जहाजे असतील आणि काही आठवडे रिक्त किंवा कोणतेही जहाज नसतील.