Join us

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादक, पण निर्यातीचं मोठं संकट उभं राहिलंय! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 12:10 PM

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादित केली जात असताना मात्र सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक केळीची निर्यात होत आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादित केली जात असताना मात्र सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक केळीची निर्यात होत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला मागे टाकत सोलापूर जिल्हा केळी निर्यातीचे हब म्हणून उदयास येत आहे. मात्र यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसमोर निर्यातीच संकट उभं राहिलं आहे. 

एकीकडे जळगाव जिल्हा केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सद्यस्थितीत केळीची काढणी सुरु असून निर्यात देखील सुरु झाली आहे. मात्र दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील केळी निर्यातीची संधी ओळखत त्या भागात २५ हजार मेट्रिक टन क्षमतेचे १२ पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभारले आहेत. या सुविधांसह टेंभुर्णी (जि. सोलापूर) हे पहिले केळी निर्यातीचे हब बनले आहे. त्यामुळे आता मोठे उत्पादक असूनही जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्यातीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव आणि पाचोरा या भागातील केळी हमखास निर्यात केली जाते. पारंपरिक केळी बागायतीऐवजी आता युवा शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. मात्र हवामानातील बदलांमुळे केळीला विविध विषाणूजन्य रोगांचा सामना करावा लागतो देशातील सर्वाधिक केळी उत्पादन जळगावत होत असले तरी सोलापूर जिल्ह्यात 25000 टन केळी निर्यातीसाठी पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहेत त्यामुळे निर्यातीच्या देशातील पहिले उभारण्यासमान सोलापूरने पटकावला आहे तसेच जागतिक बाजारपेठेतील खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी कसं पण लावले आहे यामुळे जळगाव जिल्ह्यात पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेज उभारणीकडे लक्ष वेधले गेले आहे.

पनामा रोगाचे संकट

केळी बागायतीवरील सर्वांत मोठे संकट 'फ्युसेरियम ऑक्सिस्पोरम' या पनामानामक बुरशीजन्य रोगाने बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही धुडगूस घातला आहे. या रोगाचे संकट समोर असले तरी त्याबाबत शेतकरी आणि कृषी विभाग फारसा जागरूक नाही. यात मुळापासून खोड पूर्ण पोकळ होते. आणि पानगळ होऊन खोड नष्ट होते.

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी हे देशातील पहिले केळी निर्यातीचे हब बनले आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे केळी मालाची गुणवत्ता आणि मुबलकता, उपलब्धतता आहे. पायाभूत सुविधा निर्माण करून जळगावची केळी निर्यातीमधील हुकूमत कायम राहावी, यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातील विषाणूरोग तज्ज्ञ डॉ. आर. सेल्वराजन यांना पाचारण करून तातडीने कृतिबंध उपाययोजना राबवून नियंत्रण मिळवता येईल. 

डॉ. के.बी. पाटील, आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ, जळगाव

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

टॅग्स :जळगावकेळीसोलापूर