Join us

Kanda Bajar Bhav : आज पुणे ते नागपूर बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 18:55 IST

Kanda Bajar Bhav : पुणे बाजारात लोकल कांद्याची (Local Kanda Market) सर्वाधिक दहा हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajar Bhav :  आज रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 23 हजार 636 क्विंटलची आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची (Local Kanda Market) सर्वाधिक दहा हजार क्विंटलची आवक होऊन आज कमीत कमी 750 रुपयांपासून ते सरासरी 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Lal Kanda Market) धाराशिव बाजारात कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 1200 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला पारनेर बाजारात कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 1150 रुपये, रामटेक बाजारात कमीत कमी 1300 रुपये, तर सरासरी 1400 रुपये तर राहता बाजारात कमीत कमी 300 रुपये दर सरासरी 1000 रुपये दर मिळाला.

तसेच पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याला कमीत कमी 600 रुपये तरी सरासरी 01 हजार रुपये, पुणे पिंपरी बाजारात सरासरी 1200 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 1100 रुपये दर मिळाला. दुसरीकडे सर्वसाधारण कांद्याला शिरूर कांदा मार्केटमध्ये 1100 रुपये तर छत्रपती संभाजीनगर बाजारात 750 रुपये असा नीचांकी दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/04/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल54145001000750
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल100730013001100
सातारा---क्विंटल51470015001100
धाराशिवलालक्विंटल110110013001200
पुणेलोकलक्विंटल1010860014001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4480016001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल6653001200750
मंगळवेढालोकलक्विंटल7210012301100
पारनेरउन्हाळीक्विंटल398720014001150
रामटेकउन्हाळीक्विंटल26130015001400
राहताउन्हाळीक्विंटल168930013501000
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकपुणे