Join us

Kanda Bajarbhav : मागील आठवड्यात कांदा किंमतीत अन् आवकेत 9 टक्क्यांची घट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 2:05 PM

Kanda Bajarbhav : कांद्याच्या किमतीत मात्र काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे, एकूणच मागील आठवड्यात किंमती आणि आवक कशी होती ते पाहुयात. 

Kanda Bajarbhav : एकीकडे शेतकऱ्यांकडील उन्हाळा कांदा (Summer Onion) संपत आल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. हळूहळू लाल कांद्याची आवक वाढू लागली आहे. तर कांद्याच्या किमतीत मात्र काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे एकूणच मागील आठवड्यात किंमती आणि आवक कशी होती ते पाहुयात. 

कांद्याची लासलगाव मार्केटमधील (Lasalgoan kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती ३८५८ रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ९ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत ९ टक्क्यांनी घट झाली आहे. 

मागील आठवड्यात पिंपळगाव बाजारात (Pimpalgaon Kanda Market) कांद्याच्या किंमती ४२६२ रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक होती. तर सोलापूर बाजारात कांद्याच्या किंमती २२०० रुपये प्रति क्विंटल इतक्या होत्या. यात लासलगाव बाजारात ३८५८ रुपये प्रतिक्विंटल, पिंपळगाव बाजारात ०४ हजार २६२ रुपये, अहमदनगर बाजारात २८५० रुपये तर पुणे बाजारात ३२६० रुपये दर मिळाला. 

तर साधारण २२ सप्टेंबरपासून कांदा आवक वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आणि ऑक्टोंबर च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आवक घटल्याचे दिसून आलं. तर किमतीबाबतही २२ सप्टेंबर नंतर हळूहळू किमतीमध्ये घसरण झाल्याचे कांदा साप्ताहिक बाजार अहवालावरून निदर्शनास आले आहे.

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक