Kanda Bajarbhav : आज विजयादशमी दसरा (Dasara) असल्याने राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये बंद आहेत. केवळ लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळ सत्रातील कांदा लिलाव (onion Auction) सुरु आहेत. तर जळगाव बाजारात सकाळच्या सुमारास लाल कांद्याची आवक झाली. तर क्विंटलला ४ हजार रुपये दर मिळाला.
आज दसऱ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) सर्वच बाजार समितीमध्ये लिलाव बंद आहेत. तर केवळ लासलगाव मुख्य मार्केट यार्ड वरील कांदा या शेतीमालाचे लिलाव फक्त सकाळ सत्रात होतील, ते सुरु झाले आहेत. आज सकाळी लासलगाव मार्केट यार्डात २५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर कमीत कमी २०५० रुपये तर सरासरी ४२०० रुपये दर मिळाला.
तर बाजार अहवालानुसार आज जळगाव बाजारात (Jalgaon Kanda Market) लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला ४ हजार रुपये दर मिळाला. तर दसऱ्याच्या निमित्ताने आज नाशिकच्या बागलाण तालुक्यातील कुपखेडा येथे मोसम कृषी खाजगी मार्केटचा शुभारंभ होत आहे. सकाळी दहा वाजेपासून लाल कांद्याची खरेदी होणार आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर-नळकस रोडवरील कूपखेडा येथे हे लिलाव पार पडत आहेत.