Kanda Market : एकीकडे कांदा बाजारभावात (Kanda Bajarbhav) सुधारणा होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यापासून अशीच परिस्थिती आहे. अशातच निर्यात शुल्क हटविण्याचा देखील निर्णय झाला आहे. मात्र तरी देखील फारसा फरक झालेला नाही. मागील आठवड्यात बाजारभाव (Last Week Market) कसे होते, आवक कशी झाली? ते पाहुयात...
लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील कांद्याची सरासरी (Lasalgaon Kanda Market) किंमती १४८३ रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींल ७ टक्के घट झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २२.३३ टक्के व २४.३८ टक्के इतकी वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव (निफाड) बाजारात कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक १४८३ रुपये प्रति क्विंटल होती, तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमत १२४० रुपये क्विंटल होती. आज देखील सोलापूर बाजारात १२०० रुपये दर मिळाला आहे. दुसरीकडे आजपासून लासलगाव बाजार समितीमध्ये मार्च एंडमुळे लिलाव बंद राहणार आहेत.
मागचे कांदा बाजारभाव
मागच्या आठवड्यातील कांदा बाजार भाव पाहिले असता लासलगाव निफाड बाजारात १४८३ रुपये, सोलापूर बाजारात १२४० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३९८ रुपये, अहिल्यानगर बाजारात १२६७ रुपये, तर पुणे बाजारात १२५० रुपये दर मिळाला. दुसरीकडे लासलगाव बाजारातील मागील काही दिवसांचा भावाचा आढावा घेतला असता मार्च महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ०९ मार्च रोजी कांदा बाजार भाव हे २२०० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर १६ मार्च रोजी थेट १५०० रुपयांवर येऊन पोहोचले, तर 23 मार्च रोजी १४५० ते १५०० रुपयांवर दर मिळतो आहे.