Join us

Kanda Bajarbhav : दिवाळीनंतर लासलगाव कांदा मार्केटला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 1:45 PM

Kanda Bajarbhav : दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले आहेत. आज सकाळ सत्रात लासलगाव... (Lasalgaon Kanda Market price after Diwali)

Kanda Bajarbhav : दिवाळीच्या सुट्टीनंतर (Diwali Holiday) राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव (onion Auction) सुरू झाले आहेत. आज सकाळ सत्रात लासलगाव बाजारात 800 क्विंटल कांद्याचे आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 3800 रुपये तर सरासरी 04 हजार 600 रुपये दर मिळाला. 

आज 04 नोव्हेंबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सकाळ सत्रात 19 हजार क्विंटल कांदा आवक झाली. मुंबई मार्केटला सर्वाधिक 07 हजार क्विंटल कांद्याचे आवक झाली. तर नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) लासलगाव, पिंपळगाव मार्केटला कांद्याची आवक होऊन लासलगाव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 1721 रुपये तर सरासरी 3321 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 2751 रुपये तर सरासरी 04 हजार 600 रुपये दर मिळाला. तसेच पिंपळगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला 2225 रुपये तर सरासरी 3500 रुपये दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 3600 रुपये आणि सरासरी 4600 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 6 हजार क्विंटलची आवक होऊन 3750 रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 4650 रुपये दर मिळाला. तर कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण कांद्याला 03 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा सकाळ सत्रातील बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/11/2024
कोल्हापूर---क्विंटल2471100063003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25850030001750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7427200054003700
सातारा---क्विंटल60100051003000
कराडहालवाक्विंटल99400050005000
लासलगावलालक्विंटल192172138003321
पुणेलोकलक्विंटल6701200055003750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4470050004850
पुणे-मोशीलोकलक्विंटल88250040003250
वाईलोकलक्विंटल100300065005500
कल्याणनं. १क्विंटल3460047004650
लासलगावउन्हाळीक्विंटल828275149004600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450200048004600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1200260054604600
टॅग्स :कांदादिवाळी 2024शेती क्षेत्रमार्केट यार्डशेती