Join us

Kanda Bajarbhav : सर्वपित्री अमावस्येला लासलगाव-निफाड बाजारात काय भाव? वाचा कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 7:02 PM

Kanda Bajarbhav : आज सर्वपित्री अमावस्या असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव (Onion Auction) बंद होते.

Kanda Bajarbhav : आज सर्वपित्री अमावस्या (Sarvpitri Amavasya) असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव (Onion Auction) बंद होते. त्यामुळे निवडक बाजार समितीमध्ये केवळ 13 हजार 158 क्विंटलची आवक झाली. यात लाल उन्हाळी आणि लोकल कांद्याचा समावेश आहे. तर आज कांद्याला कमीत कमी 2650 रुपयांपासून ते चार हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 02 ऑक्टोबर 2024 रोजी नाशिक बाजार समितीत (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 915 क्विंटलची आवक झाली तर लासलगाव-निफाड बाजारात 1850 क्विंटल कांदा आला. नाशिक बाजार समितीत 3950 रुपये तर लासलगाव निफाड बाजारात चार हजार दोनशे रुपये दर मिळाला. तर संगमनेर बाजारात 2775 रुपये आणि पारनेर बाजारात 3850 रुपये दर मिळाला.  

तसेच पुणे-पिंपरी बाजार समितीत (Pune Kanda Market) लोकल कांद्याला 03 हजार 150 रुपये तर मंगळवेढा बाजारात 2600 रुपये दर मिळाला. त्याचबरोबर लाल कांद्याला बारामती बाजारात 2800 रुपये, संगमनेर बाजारात 2700 रुपये तर भुसावळ बाजारात 04 हजार 200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे कांदा बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/10/2024
अहमदनगरलालक्विंटल141275042502650
अहमदनगरउन्हाळीक्विंटल4369135044263313
जळगावलालक्विंटल5400042004200
कोल्हापूर---क्विंटल3611150043003000
नाशिकउन्हाळीक्विंटल2765290044014075
पुणेलोकलक्विंटल8300047003150
पुणेलालक्विंटल72540040002800
सातारा---क्विंटल70300042003600
सोलापूरलोकलक्विंटल19310030502600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)13158
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती