Onion Market : गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजार भाव टिकून असल्याचे चित्र आहे. आज कांद्याला कमीत कमी 2600 रुपयांपासून ते 4 हजार 400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर मागील आठवड्यात साधारण 04 हजार 31 रुपयांपर्यंत दर मिळाला. कांदा दरात दिलासादायक चित्र आहे.
तसेच मागील आठवड्यातील कांद्याची आवक ही कमी झाल्याचे दिसून आले 11 ऑगस्ट रोजी साधारण 100 टन आवक 18 ऑगस्ट रोजी 105 ते 120 टन आवक, 25 ऑगस्ट रोजी 110 ते 120 टन आवक, 01 सप्टेंबर रोजी 103 टनांपर्यंत आवक तर पुन्हा 8 सप्टेंबर रोजी 110 टनांपर्यंत आवक अशी आवकेत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घट झाली आहे.
कांद्याची लासलगाव मागील सरासरी बाजारातील सप्ताहातील किंमती 4031 रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत 9 टक्केनी वाढ झाली आहे. मागील लासलगाव आठवड्यात बाजारात कांद्याच्या किंमती प्रति क्विंटल 4031 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक होत्या. तर सोलापूर बाजारात कांद्याच्या किंमती 3520 रुपये प्रति क्विंटल इतक्या होत्या.