Join us

Kanda Weekly Market : कांद्याच्या किंमतीत क्विंटलमागे 3 टक्क्यांची घट, वाचा साप्ताहिक बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 16:19 IST

Kanda Weekly Market : लासलगाव बाजारातील (Lasalgoan Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती २३५० रुपये प्रति क्विंटल होत्या.

Kanda Weekly Market :  कांद्याची लासलगाव बाजारातील (Lasalgoan Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती २३५० रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ३ टक्के घट झाली आहे. तसेच मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ३.७२% व १०.८१% इतकी घट झाली आहे.

मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव बाजारात कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक २३५० रुपये प्रति क्विंटल होती, तर अहिल्यानगर बाजारात सर्वात कमी किंमत १६३८ रुपये प्रति क्विंटल होती. 

तसेच मागील आठवड्यातील कांद्याच्या निवडक बाजारातील सरासरी किमती पाहिल्या असता सोलापूर बाजारात १८२० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात २१७९ रुपये, अहिल्यानगर बाजारात १६३८ रुपये तर पुणे बाजारात १९९२ रुपये दर मिळाला.

तसेच भारत व महाराष्ट्रातील कांद्याची साप्ताहिक पाहिले असता मागील आठवड्यात आवक देखील घटल्याचं दिसून येत आहे. साधारण १९ जानेवारीपासून आवकेत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आवकेत घसरण पाहायला मिळाली. बाजारभाव अहवालानुसार मागील आठवड्यात महाराष्ट्रात १ लाख २८ हजार टन आणि देशभरात ३ लाख २६ हजार टन आवक झाली.

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती