Lal Kanda Market : गेल्या महिनाभरापासून लाल कांदा दरात (Lal Kanda Market) सातत्याने घसरण सुरूच आहे. मागील आठवड्यातील लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजाराचा आढावा घेतला जवळपास १३० रुपयांची घसरण दिसून आली. २४ फेब्रुवारीला लाल कांद्याला क्विंटलमागे २४०० रुपये दर मिळाला होता, मात्र ०१ मार्च रोजी हा दर २२७० रुपयांवर येऊन ठेपला.
मागील आठवड्यात कोणत्या दिवशी कसे बाजारभाव (Kanda Market) मिळाले, ते पाहुयात. यात २४ फेब्रुवारी रोजी सरासरी २४०० रुपये दर मिळाला. २५ फेब्रुवारी रोजी २४२५ रुपये, २६ फेब्रुवारी रोजी २५०० रुपये, २७ फेब्रुवारी २४०० रुपये, २८ फेब्रुवारी रोजी २३०० रुपये तर ०१ मार्च रोजी २२७० रुपये दर मिळाला. म्हणजेच लासलगाव बाजारात देखील घसरण सुरूच आहे.
तसेच मागील आठवड्यात सोलापूर बाजारातील आढावा घेतला असता बाजारभाव जैसे थे आहेत. यात २४ फेब्रुवारी रोजी सरासरी १८०० रुपये दर मिळाला. २५ फेब्रुवारी रोजी १९०० रुपये, २६ फेब्रुवारी रोजी अकलूज बाजारात २००० रुपये, २७ फेब्रुवारी १८०० रुपये, २८ फेब्रुवारी रोजी १८०० रुपये तर ०१ मार्च रोजी १८०० रुपये दर मिळाला. या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज सकाळ सत्रातील बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
03/03/2025 | ||||||
मुंबई - कांदा बटाटा मार्केट | --- | क्विंटल | 15988 | 1300 | 2700 | 2000 |
कराड | हालवा | क्विंटल | 99 | 1500 | 2000 | 2000 |
मनमाड | लाल | क्विंटल | 3500 | 500 | 2348 | 1900 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 7 | 2300 | 2300 | 2300 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 315 | 700 | 2200 | 1450 |