Join us

Lal Kanda Market : मागील आठवड्यात सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमध्ये भाव कसे होते? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:38 IST

Lal Kanda Market : लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजाराचा आढावा घेतला जवळपास १३० रुपयांची घसरण दिसून आली.

Lal Kanda Market : गेल्या महिनाभरापासून लाल कांदा दरात (Lal Kanda Market) सातत्याने घसरण सुरूच आहे. मागील आठवड्यातील लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजाराचा आढावा घेतला जवळपास १३० रुपयांची घसरण दिसून आली. २४ फेब्रुवारीला लाल कांद्याला क्विंटलमागे २४०० रुपये दर मिळाला होता, मात्र ०१ मार्च रोजी हा दर २२७० रुपयांवर येऊन ठेपला. 

मागील आठवड्यात कोणत्या दिवशी कसे बाजारभाव (Kanda Market) मिळाले, ते पाहुयात. यात २४ फेब्रुवारी रोजी सरासरी २४०० रुपये दर मिळाला. २५ फेब्रुवारी रोजी २४२५ रुपये, २६ फेब्रुवारी रोजी २५०० रुपये, २७ फेब्रुवारी २४०० रुपये, २८ फेब्रुवारी रोजी २३०० रुपये तर ०१ मार्च रोजी २२७० रुपये दर मिळाला. म्हणजेच लासलगाव बाजारात देखील घसरण सुरूच आहे. 

तसेच मागील आठवड्यात सोलापूर बाजारातील आढावा घेतला असता बाजारभाव जैसे थे आहेत. यात २४ फेब्रुवारी रोजी सरासरी १८०० रुपये दर मिळाला. २५ फेब्रुवारी रोजी १९०० रुपये, २६ फेब्रुवारी रोजी अकलूज बाजारात २००० रुपये, २७ फेब्रुवारी १८०० रुपये, २८ फेब्रुवारी रोजी १८०० रुपये तर ०१ मार्च रोजी १८०० रुपये दर मिळाला. या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

आज सकाळ सत्रातील बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/03/2025
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15988130027002000
कराडहालवाक्विंटल99150020002000
मनमाडलालक्विंटल350050023481900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7230023002300
पुणे-मोशीलोकलक्विंटल31570022001450
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक