Join us

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांदा घसरला, लासलगाव, पिंपळगावला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 5:45 PM

Kanda Bajarbhav : आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये 3 हजार क्विंटलची आवक झाली, तर बाजारभाव इतका मिळाला?

Kanda Bajarbhav :कांदा बाजारभावात (Kanda Bajarbhav) काहीशी घसरण झाल्याचे चित्र आहे. आज लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 03 हजार 72 क्विंटल आवक होऊन 3900 रुपये असा सरासरी दर मिळाला. तर कांद्याला कमीत कमी 2950 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पाहुयात आजचे सविस्तर बाजारभाव

आज 10 सप्टेंबर 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) उन्हाळ कांद्याची 51 हजार 700 क्विंटलची आवक झाली तर येवला बाजारात 3550 रुपये, सिन्नर, कळवण बाजारात 3850 रुपये, चांदवड बाजारात 3810 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3750 रुपये दर मिळाला. मागील चार ते पाच दिवसात 300 ते 400 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. 

आज लाल कांद्याला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3500 रुपये, धुळे बाजारात 3400 रुपये, तर सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला 03 हजार रुपये, पुणे बाजारात 3600 रुपये तर सर्वसाधारण कांद्याला अकोला, कोल्हापूर बाजारात 03 हजार रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 3950 तर सातारा बाजार समितीत सर्वाधिक 04 हजार 250 रुपये दर मिळाला.

पाहूयात सविस्तर कांदा बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/09/2024
अहमदनगर---क्विंटल2183175047003700
अहमदनगरलोकलक्विंटल9100038002400
अहमदनगरलालक्विंटल210100042003500
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1927150044002950
अकोला---क्विंटल418200043003000
अमरावतीलालक्विंटल309200050003500
बुलढाणालोकलक्विंटल67245040003750
चंद्रपुर---क्विंटल699375050004250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल593130042002750
धुळेलालक्विंटल121135038503400
जळगावलोकलक्विंटल600350041413800
कोल्हापूर---क्विंटल2082150045003000
मंबई---क्विंटल8136360043003950
नागपूरलोकलक्विंटल26350045004000
नागपूरलालक्विंटल3350050004233
नाशिकउन्हाळीक्विंटल51700185741343785
पुणे---क्विंटल500300045004000
पुणेलोकलक्विंटल10255306742333617
पुणेचिंचवडक्विंटल7667250045103700
सांगलीलोकलक्विंटल1600160044003000
सातारा---क्विंटल40400045004250
साताराहालवाक्विंटल150300040004000
ठाणेनं. १क्विंटल3380040003900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)89298
टॅग्स :कांदानाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र