Kanda Market : राज्यातील कांदा बाजारात (Kanda Bajar) कमी अधिक प्रमाणात आवक घटली असली तरी बाजारभाव मात्र कमालीचे घटले आहेत. मागील आठवड्यात नाशिकच्या पिंपळगाव बाजारात सरासरी ४६१० रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला.
मागील आठवड्यातील कांदा आवक पाहिले असता नंबरचा सुरुवातीपासून आवक चांगलीच वाढली होती. (Kanda Market) पंधरा तारखेनंतर राज्यात 100 टनांपेक्षा अधिक तर १५० टनांपेक्षा कमी आवक होऊ लागली आहे. यात देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत ०.६ टक्केनी घट झाली आहे.
कांद्याची बाजारातील सप्ताहातील लासलगाव (Lasalgaon Kanda Market) मागील सरासरी किंमती रु. ४५४४ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत थोडी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात पिंपळगाव बाजारात कांद्याच्या किंमती ४६१० रुपये क्विंटल सर्वाधिक होत्या. तर अहमदनगर बाजारात कांद्याच्या किंमती ३३९१ रुपये क्विंटल इतकी मिळाली. लासलगाव बाजारात ०४ हजार १०३ रुपये, सोलापूर बाजारात ३८६६ रुपये, पुणे बाजारात ३८७५ रुपये दर मिळाला.
दरात घसरण झाली..
एकीकडे कांद्याला चांगला भाव मिळत असताना लागलीच आठवडाभरापासून दरात घसरण सुरु आहे. आजमितीस कांदा चार हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. शेतकरी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी दाखल करत आहरेत. शिवाय कांदा थोड्याफार प्रमाणात शिल्लक असल्याने लागलीच कांदा दरात पुन्हा वाढ होईल अशी आशा आहे.
संकलन : स्मार्ट प्रकल्प अंतर्गत माहिती विश्लेषण जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे.