Kanda Market Update : कांद्याची लासलगाव बाजारातील (Lasalgaon Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती २३७१ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ३.३१ टक्के वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ९ टक्के घट झाली आहे व राज्य पातळीवर २ टक्के वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव बाजारात (Kanda Market Update) कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक २३७१ रुपये प्रतिक्विंटल होती, तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमत १७५० रुपये प्रतिक्विंटल होती.
मागील आठवड्यात काही निवडक बाजार समितीमध्ये काय भाव मिळाला ते पाहुयात, सोलापूर (Last week Kanda Market) बाजारात १७५० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार १९४२ रुपये, अहिल्यानगर बाजारात १९५० रुपये, तर पुणे बाजारात २०६० रुपये दर मिळाला.
लासलगाव बाजारातील कांद्याची साप्ताहिक सरासरी किमती पाहिल्या तर जानेवारीच्या सुरुवातीला १५०० रुपयांपासून ते ०२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. महिनाभरानंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा दर २००० रुपयांपासून ते २२०० पर्यंत मिळाला. त्यानंतर ०९ फेब्रुवारी रोजी हा दर २३७१ रुपयांपर्यंत पोहोचला. तर काल हा दर २५५१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.