Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Market : कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Kanda Market Onion prices likely to increase by Holi festival, know in detail | Kanda Market : कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Market : कांद्याचे दर कितीने घसरले, होळीपर्यंत दर वाढतील का? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Market : सद्यस्थितीत कांद्याच्या किमतीतील चढ-उतार (Kanda Market rate) हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Kanda Market : सद्यस्थितीत कांद्याच्या किमतीतील चढ-उतार (Kanda Market rate) हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  सद्यस्थितीत कांद्याच्या किमतीतील चढ-उतार (Kanda Market rate) हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे . सध्या देशभरातील बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर मंदावलेले असताना, होळी जवळ येताच कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने कांद्याचे दर (Kanda bajarbhav) पुन्हा वाढू शकतात, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. अशा परिस्थितीत, देशातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कांद्याची भाव काय आहेत ते जाणून घेऊया.

सप्टेंबरमध्ये सर्वोच्च दर
गेल्यावर्षी झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीने कांदा पिकाचे नुकसान झाले होते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये उन्हाळी कांद्याला ४ हजार १४१ रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो कांदा खरेदी (Onion Market Price) करण्यासाठी ७५ ते ८० रुपये मोजावे लागायचे. यानंतर मात्र गत तीन महिन्यांपासून पावसाळी लाल कांद्याची आवक वाढल्याने दर काहीसे खाली आले.

दीड महिन्यापूर्वी ३८०० रुपये भाव
गत चार ते पाच महिन्यांपासून कांद्याचे दर सारखे उसळी घेत आहे. १२ नोव्हेंबर रोजी लाल कांद्याचे लिलाव ३८०० रुपये प्रतिक्विंटल असे झाले होते. यानंतर मात्र सातत्याने भाव खाली येत आहे. सोमवारी २३५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.

देशभरातील बाजारभाव पाहुयात.. 

बाजार समिती

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

बाराहाट260030002800
दानापुर480052005000
जयनगर380040003900
जमुई230025002400
कोचस220024002300
ताजपुर300035003200

 

महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव

बाजार समिती

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

अकोला140024002000
चंद्रपुर150023001800    
छत्रपति संभाजीनगर100025001750
हिंगना240030002836
नासिक120029002400
नेवासा(घोड़ेगांव)100027002200
पुणे(खड़िकी)160022001900
पुणे(मोशी)70022001450
पुणे(पिंपरी)230023002300

 

हरियाणामधील कांदा बाजारभाव

बाजार समिती

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

बहादुरगढ़200033002500
बरवाला250025002500
बरवाला(हिसार)175030002500
ऐलनाबाद180030002300
फारुख नगर400045004000
फतेहाबाद250050003500
घरौंदा    270030003000
गोहाना200030002500
गुडगाँव200030002500
हांसी200035003000

Web Title: Latest News Kanda Market Onion prices likely to increase by Holi festival, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.