नाशिक : कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकरी वर्ग मजूर टंचाई तसेच वाहतूक खर्च यावर होणाऱ्या आर्थिक खर्चामुळे अनेक शेतकरी जागेवरच कांदा विक्रीला (Kanda Vikri) पसंती देत आहेत. दिवसेंदिवस कांद्याचे दर (Kanda Bajarbhav) कमी होत असताना अनेक शेतकऱ्यांनी वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईमुळे शेतकऱ्यांचे कांदे निवडण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी जागेवरच पोळ मारून ठेवत आहे.
कांदा व्यापारी शेतातच कांदे बघून त्याप्रमाणे दर ठरवतात. तसेच कांदा व्यापारी स्वतः आपले मजूर सांगून कांदे निवडून जागेवरच गाडी भरून बाहेरील राज्यात कांदा विक्रीसाठी पाठवतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा मजुरीचा खर्च व वाहतूक खर्चात आर्थिक बचत होते. शेतकऱ्यांना रोख पैसे मिळतात, कांदा व्यापाऱ्यांकडून (Nashik Kanda Market) जागेवर कांद्याची प्रतवारी बघून ८०० ते ९५० रुपये दर दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतीतचकांदा विक्रीला सध्या पसंती मिळत आहे.
तसेच पिंपळगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांना रांगेत गाड्या लावून ताटकळत उभे राहावे लागते. कांदा व्यापारी थेट शेतात जाऊनच शेतकऱ्याचा कांदा खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना कांद्याचे वजन झाल्यानंतर शेतात रोख स्वरूपात पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शेतातच कांदे विकणे सोयीस्कर वाटत आहे.
शेतातूनच कांदा आम्ही खरेदी करत आहोत. क्विंटलला कांद्याची प्रतवारी बघून ७०० ते २५० पर्यंत आम्ही दर देत आहोत. तसेच हा कांदा शेतातून थेट मुंबई अथवा बाहेरच्या राज्यातील बाजार समितीत विक्रीस जातो. शेतकरी जागेवरच कांदा विक्रीला पसंती देत आहे.
-दीपक राजोळे, कांदा व्यापारी