Weekly Cotton Market : राज्यातील काही भागात कापूस वेचणीला (Cotton Production) सुरुवात झाली असून अशा स्थितीत कापसाची आवक स्थिर असल्याचे चित्र आहे. मात्र देशांतर्गत आवक वाढले असल्याचे बाजार अहवालावरून निदर्शनास आले आहे. एकूण मागील आठवड्याचा (Last Week Cotton Market) बाजारभाव 08 हजार 163 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
मागील आठवड्याचा बाजारभाव पाहिला असता राजकोट बाजार समितीत (Rajkot Cotton Market) 08 हजार 163 रुपये प्रतिक्विंटल, नागपूर बाजारात 7 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल, वर्धा बाजारात 7 हजार 960 रुपये प्रतिक्विंटल, यवतमाळ बाजारात 780 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजारात 7 हजार 958 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
तर मागील आठवड्यातील आवक पाहिली असता राज्यातील आवक जैसे थे असून देशांतर्गत आवक सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढत आहे. यामध्ये जवळपास 17 ते 18 हजार टन इतकी आवक होऊ लागली आहे. कापूस वेचणीचा हंगाम जसा जसा वेग घेईल, त्याप्रमाणे राज्यातील बाजारात कापसाची आवक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक स्तरावर काय स्थिती?
दरम्यान 2024-25 साठी जागतिक कापूस ताळेबंदात, उत्पादन, उपभोग, व्यापार आणि प्रारंभ आणि समाप्ती साठा सर्व कमी केले आहेत. चीनमधील मोठ्या पिकाची भरपाई करण्यापेक्षा युनायटेड स्टेट्स, भारत आणि पाकिस्तानमधील लहान पिके म्हणून जागतिक उत्पादन सुमारे 1.2 दशलक्ष गाठी कमी झाले आहे. व्हिएतनाममध्ये 2,00,000 गाठी कमी झाल्यामुळे आणि बांगलादेश आणि तुर्कीमध्ये 100,000 गाठी कमी झाल्यामुळे जागतिक वापर सुमारे 4,60,000 गाठी कमी झाला आहे. चीन, व्हिएतनाम, तुर्की आणि बांगलादेश यांनी आयात कमी केल्याने भारतातील वाढीची भरपाई झाल्यामुळे जागतिक व्यापार सुमारे 550,000 गाठी कमी झाला आहे. जागतिक स्तरावरील शेअर्स ऑगस्टपासून 1.1 दशलक्ष गाठी कमी होऊन सुमारे 76.5 दशलक्ष झाले आहेत.