Join us

Kapus Bajarbhav : जानेवारी २०२५ मध्ये कापसाला हमीभाव मिळण्याची आशा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:37 IST

Kapus Bajarbhav : अपवाद वगळता कोणत्याच बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाला (Medium Cotton) हमीभाव मिळत नाही.

Kapus Bajarbhav : एकीकडे मध्यम स्टेपल कापसाला केंद्र सरकारने ७१२१ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र अपवाद वगळता कोणत्याच बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाला (Medium Steple Cotton) हमीभाव मिळत नाही. दुसरीकडे लांब स्टेपल कापसाला 07 हजार 521 रुपये हमीभाव आहे, तर बाजार भाव पाहिला तर सरासरी ७२०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. तर आगामी जानेवारी ते मार्च २०२५ यादरम्यान कापसाला अंदाजे ७५०० रुपये ते ०८ हजार ५०० रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.

कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक  (Cotton Crop) आहे जे 'व्हाइट-गोल्ड' म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५ टक्के वाटा भारताचा आहे. राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. महिन्यातील बाजारातील कापसाचे आवक गतवर्षीपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. 

२०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन १२०२ लक्ष गाठीपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. एकूणच, गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टीकोन सुधारला असूनही २०२४-२५ विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे. USDA-FAS च्या अंदाजानुसार विपणन वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील कापूस उत्पादन २५.४ दशलक्ष ४८० Ib bales आहे., शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी, मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळवतील या अपेक्षेमुळे पेरणी केलेल्या १२.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

अशा राहतील किंमती 

तर अकोला बाजारपेठेत मध्यम धाग्याच्या कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत.  मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील कापसाच्या किमती पुढीलप्रमाणे जानेवारी ते मार्च २०२२ मध्ये ९५४५ रुपये प्रतिक्विंटल, जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये ८ हजार ८० रुपये प्रतिक्विंटल, जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये ०७ हजार १२० रुपये प्रति क्विंटल आणि यंदा म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७५०० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल राहतील.

Soyabean Market : देशात सोयाबीनचे 'इतके' टन उत्पादन, नवीन वर्षांत काय भाव मिळणार?

टॅग्स :कापूसशेती क्षेत्रमार्केट यार्डकॉटन मार्केट