Lokmat Agro >बाजारहाट > Kapus Bajarbhav : कापसाला खेडा खरेदीत काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Kapus Bajarbhav : कापसाला खेडा खरेदीत काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kapus Bajarbhav see cotton market price in nandurbar market yard and cci center | Kapus Bajarbhav : कापसाला खेडा खरेदीत काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Kapus Bajarbhav : कापसाला खेडा खरेदीत काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Kapus Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवल्याचे चित्र आहे.

Kapus Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kapus Bajarbhav : कापसाला यंदा भाव (Cotton Market) देखील अपेक्षित मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवला आहे. नंदुरबार बाजार समितीच्या खरेदी केंद्रात कापसाला (Cotton Market At CCI)  प्रतवारीनुसार 6 हजार 500 ते 7 हजार 150 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. 

यंदा कापसाचे कमी उत्पादन आणि कमी भाव यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मीही खरेदी झाली नसल्याची स्थिती आहे. सीसीआयकडून प्रतवारीनुसार 7 हजार 200 ते 7 हजार 521 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. खाजगी अर्थात खेडा खरेदी करणारे व्यापारी देखील यापेक्षा जास्त भाव देत नसल्याची स्थिती आहे. शिवाय त्यांच्याकडून तोलाईबाबत फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. नंदुरबार खरेदी केंद्रात आतापर्यंत केवळ १४ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. 

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने कापसाला फटका बसला आहे. परिणामी यंदा कापूस खरेदी केंद्रांवर अपेक्षित आवक होत नसल्याची स्थिती आहे. यंदा लवकर कापूस हंगाम संपणार अशी शक्यता आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवल्याचे चित्र आहे.

वाचा आजचे बाजारभाव 
आज वडवणी बाजारात सर्वसाधारण कापसाची 281 क्विंटलची आवक झाली. कमीत कमी 06 हजार 800 10 रुपये तर सरासरी 07 हजार रुपये दर मिळाला. तर पारशिवनी बाजारात एच 4 मध्यम स्टेपल कापसाला कमीत कमी 07 हजार 50 रुपये, तर सरासरी 07 हजार 150 रुपये वरोरा बाजारात लोकल कापसाला कमीत कमी 07 हजार 850 रुपये तर सरासरी 07 हजार रुपये दर मिळाला.

Web Title: Latest News Kapus Bajarbhav see cotton market price in nandurbar market yard and cci center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.