Lokmat Agro >बाजारहाट > Keli Bajar Bhav : केळीच्या दरात घसरण, 'या' महिन्यात बाजारभाव वाढतील, वाचा सविस्तर 

Keli Bajar Bhav : केळीच्या दरात घसरण, 'या' महिन्यात बाजारभाव वाढतील, वाचा सविस्तर 

Latest News Keli Market Banana prices fall, market prices will increase next month, read in detail | Keli Bajar Bhav : केळीच्या दरात घसरण, 'या' महिन्यात बाजारभाव वाढतील, वाचा सविस्तर 

Keli Bajar Bhav : केळीच्या दरात घसरण, 'या' महिन्यात बाजारभाव वाढतील, वाचा सविस्तर 

Keli Bajar Bhav : केळी कापणीला आल्यानंतर केळीचे बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

Keli Bajar Bhav : केळी कापणीला आल्यानंतर केळीचे बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव : सूर्य ढगाळ वातावरणाची घालमेल करीत एप्रिलच्या मध्यातच मे-हीटचा अकाली तडाखा (Temperature) देऊ लागल्याने नवती बागांमधील केळी मालाची परिपक्वता वेगात होऊन केळी मालाची आवक कमालीची (Keli Avak) वाढली. केळी कापणीला आल्यानंतर केळीचे बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धतता वाढली आहे. मात्र उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्याने दि. १ एप्रिलपासून १०० ते २०० रुपयांनी बाजारभाव घसरत आहेत.

बहऱ्हाणपूर लिलाव बाजारातील आज ९९ गाड्यांचा केळी मालाच्या प्रतवारीनुसार झालेल्या लिलावात (Banana Market) किमान भात ६०१ रुपये प्रतिक्विंटल तर कमाल भाव ११०१ रुपये, तर सर्वोत्कृष्ट भाव १३७५ रुपये प्रतिक्विंटल असे घोषित करण्यात आले. तसेच रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी भाव समितीकडून आज कमाल भाव १७२५ रुपये, तर किमान भाव १५७५ रुपये प्रतिक्विंटल घोषित करण्यात आला आहे.

उन्हाळ्यानंतर होऊ शकते केळीची भाववाढ
बन्हाणपूर बाजार समितीच्या लिलाव बाजारातील केळी भावांवरचं केळी बाजारभावांचे चलचित्र सुरू राहत असल्याचे वास्तव चित्र आहे. आज बाजारात द्राक्षे, संत्री, मोसंबी आले असल्याने रसाळ फळांकडे ग्राहक वळला आहे. तरीही आंब्याला परिपक्वतेची गोडी व कलिंगड तथा खरबुजांना गोडी नसल्याने केळीवर फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. किंबहुना ही उष्ण लाट टळल्यानंतर बाजार भाव उंचावण्याची अपेक्षा उंचावल्या आहेत.

मे हीटचा तडाखा एप्रिल महिन्यातच जाणवू लागल्याने केळी मालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, उत्तर भारतात उष्णतेमुळे मागणीत घट जाणवू लागल्याने केळी बाजारभावात घसरण आहे.
- किशोर गणवानी, केळी निर्यातदार, रावेर

प्रचंड उष्णतेमुळे उन्हाळी हंगामातील रसाळ फळांकडे ग्राहक आकर्षिला जात असल्याने केळी बाजारभावात घसरण जाणवत आहे. किंबहुना बन्हाणपूर लिलाव बाजारातील अस्थिरता केळी भावांमधील घसरणीला कारणीभूत ठरत आहे.
- विशाल अग्रवाल, केळी निर्यातदार, रावेर

Web Title: Latest News Keli Market Banana prices fall, market prices will increase next month, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.