एकीकडे कायम करण्यात आलेली निर्यातबंदी आणि दुसरीकडे सातत्याने दरात होत असलेली घसरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. एकीकडे उन्हाळ कांदा बाजारात येऊ लागला असताना मात्र बाजारभाव मिळत नसल्याने कांदा आणावा की नाही अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आज रविवार आणि होळीचा दिवस असल्याने अनेक बाजार समिती बंद असून निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले आहेत. त्यानुसार आज लाल कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला.
आज 24 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राहता, जुन्नर -आळेफाटा, पुणे, पुणे- खडकी , पुणे-पिंपरी, भुसावळ, पुणे-मोशी, मंगळवेढा, पारनेर या बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. आज भुसावळ बाजार समितीत 19 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर आज सर्वाधिक 13 हजार 393 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कांद्याला 1350 रुपये दर मिळाला.
जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत चिंचवड कांद्याची 3803 क्विंटल आवक झाली होती. या कांद्याला सरासरी 1450 रुपये दर मिळाला. पारनेर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 6360 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी उन्हाळ कांद्याला सरासरी 1250 रुपये दर मिळाला. पुणे मोशी आणि मंगळवेढा बाजार समितीत लोकल कांद्याला अनुक्रमे 850 रुपये, 800 रुपये दर मिळाला.
असे आहेत आजचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
24/03/2024 | ||||||
राहता | --- | क्विंटल | 1072 | 200 | 1500 | 1100 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 3803 | 1000 | 1810 | 1450 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 19 | 1000 | 1500 | 1200 |
पुणे | लोकल | क्विंटल | 13393 | 500 | 2200 | 1350 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 11 | 800 | 1500 | 1150 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 9 | 1200 | 1500 | 1350 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 338 | 500 | 1200 | 850 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 5 | 400 | 800 | 800 |
पारनेर | उन्हाळी | क्विंटल | 6360 | 400 | 1700 | 1250 |