Join us

Onion Market : होळीच्या दिवशी लाल उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 5:28 PM

आज होळीचा दिवस असल्याने अनेक बाजार समिती बंद असून निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले आहेत.

एकीकडे कायम करण्यात आलेली निर्यातबंदी आणि दुसरीकडे सातत्याने दरात होत असलेली घसरण यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. एकीकडे उन्हाळ कांदा बाजारात येऊ लागला असताना मात्र बाजारभाव मिळत नसल्याने कांदा आणावा की नाही अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आज रविवार आणि होळीचा दिवस असल्याने अनेक बाजार समिती बंद असून निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले आहेत. त्यानुसार आज लाल कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला. 

आज 24 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राहता, जुन्नर -आळेफाटा, पुणे, पुणे- खडकी    , पुणे-पिंपरी, भुसावळ, पुणे-मोशी, मंगळवेढा, पारनेर या बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. आज भुसावळ बाजार समितीत 19 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर आज सर्वाधिक 13 हजार 393 क्विंटल लोकल  कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कांद्याला 1350 रुपये दर मिळाला. 

जुन्नर -आळेफाटा    बाजार समितीत चिंचवड कांद्याची 3803 क्विंटल आवक झाली होती. या कांद्याला सरासरी 1450 रुपये दर मिळाला. पारनेर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 6360 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी उन्हाळ कांद्याला सरासरी 1250 रुपये दर मिळाला. पुणे मोशी आणि मंगळवेढा बाजार समितीत लोकल कांद्याला अनुक्रमे 850 रुपये, 800 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/03/2024
राहता---क्विंटल107220015001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3803100018101450
भुसावळलालक्विंटल19100015001200
पुणेलोकलक्विंटल1339350022001350
पुणे- खडकीलोकलक्विंटल1180015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल3385001200850
मंगळवेढालोकलक्विंटल5400800800
पारनेरउन्हाळीक्विंटल636040017001250
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदापुणेहोळी 2024