Join us

अमरावतीपासून फुलंब्रीपर्यंत, जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 7:56 PM

आज कुठल्या बाजार समितीत कापसाला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

गेल्या अनेक दिवसांपासून  विवंचनेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासादायक भाव मिळत आहे. आता साठवून ठेवलेला कापूस शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढत आहेत. कालच यंदाच्या हंगामातील सर्वाधिक भाव मिळाला होता. त्यानंतर आज मात्र काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. आजच्या दर अहवालानुसार सरासरी 7 हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. 

आज 02 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार एकूण बारा बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक झाली होती. अमरावती, भद्रावती, अकोला, अकोला (बोरगावमंजू), उमरेड, मनवत, वरोरा, वरोरा-माढेली, वरोरा-खांबाडा, हिंगणा, सिंदी(सेलू), फुलंब्री आदी बाजार समित्या मिळून एकूण 9 हजार 768    क्विंटल इतकी आवक झाली. या सगळ्यात मनवत बाजार समितीमध्ये 2800 क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. तर सर्वात कमी आवक हिंगणा बाजार समितीमध्ये झाली. तर सरासरी 6800 रुपयांपासून ते 7675 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 

दरम्यान, आज  बाजार समित्यांमध्ये मध्यम स्टेपल, लोकल या दोन वाणांची कापसाची बाजार समितीमध्ये आवक झाली होती. तर सर्वाधिक बाजारभाव म्हणजेच 7 हजार 675 रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर अकोला बाजार समितीमध्ये मिळाला आहे. काल ज्या मानवत बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर मिळाला होता, आज त्या बाजरी समितीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजेच  7 हजार 650 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला आहे. तर आजच्या दिवसातील सर्वात कमी दर हिंगणा आणि भद्रावती या बाजार समितीमध्ये मिळाला. इथे प्रति क्विंटलला 6 हजार 800 रुपये दर मिळाला. 

असे आहेत राज्यातील कापसाचे दर 

 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/03/2024
अमरावती---क्विंटल79710072007150
भद्रावती---क्विंटल240640072006800
अकोलालोकलक्विंटल85750078507675
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल98720080007600
उमरेडलोकलक्विंटल331690073007150
मनवतलोकलक्विंटल2800670077257650
वरोरालोकलक्विंटल1682600074006900
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600600073507050
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1052680073507000
हिंगणालोकलक्विंटल40655671006800
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2500665076007500
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल261675072006900
टॅग्स :शेतीबाजारकापूसकॉटन मार्केट