Kothimbir Market : आज पुणे बाजारात कोथिंबीरीच्या (Kothimbir Market) १२ हजार ९६० जुड्यांची आवक झाली. तर पुणे मोशी बाजारात १८ हजार आणि मंगळवेढा बाजारात २८०० जुड्यांची आवक झाली. तर काल नाशिक बाजारात (Nashik Market) ४९१ क्विंटलचे आवक होऊन ४८०० रुपये दर मिळाला. तर २५ ऑक्टोबर रोजी ५८५ क्विंटल ची आवक होऊन ४३०० रुपये दर मिळाला. म्हणजेच एका दिवसात क्विंटल मागे ५०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.
परतीच्या पावसाने (Rain) शेतातील उभे पीक प्रमाणात खराब झाले असले तरी कोथिंबिरीची आवक विशेष प्रमाणात घटलेली नाही. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोथिंबिरीला मागणी असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या कोथिंबिरीचे बाजार टिकून आहे. शनिवारी (दि.२६) लिलावात शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कोथिंबीर जुडीला १५० रुपये असा दर मिळाला.
तर नाशिक बाजारात शुक्रवारी लिलावात १२० रुपये प्रतिजुडी दर आणि शनिवारी १५० रुपये दर मिळाला असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. परतीच्या पावसाने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला असल्याने काही प्रमाणात शेतमाल खराब येत आहे, मात्र सण उत्सवाचा कालावधी असल्याने कोथिंबीरला मागणी वाढली असल्याने बाजार तेजीत आले आहेत. तीन दिवसांपूर्वी कोथिंबीर जुडीला ९० रुपये दर लिलावात मिळाला होता.
पहा आजचे बाजारभाव (प्रति क्विंटलमध्ये)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
27/10/2024 | ||||||
पुणे | लोकल | नग | 116960 | 6 | 20 | 13 |
पुणे -पिंपरी | लोकल | नग | 2450 | 7 | 12 | 10 |
पुणे-मोशी | लोकल | नग | 18900 | 8 | 12 | 10 |
भुसावळ | लोकल | क्विंटल | 13 | 5500 | 6600 | 6000 |
मंगळवेढा | लोकल | नग | 2800 | 5 | 13 | 8 |